आजचे पंचांग व राशीभविष्य दिनांक :- २०/०८/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁1🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण २९ शके १९४६
दिनांक :- २०/०८/२०२४,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१३,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५१,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति २०:३३,
नक्षत्र :- शततारका समाप्ति २७:१०,
योग :- अतिगंड समाप्ति २०:५५,
करण :- बालव समाप्ति १०:१६,
चंद्र राशि :- कुंभ,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – मघा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:४२ ते ०५:१७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५८ ते १२:३२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १२:३२ ते ०२:०७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:४२ ते ०५:१७ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
इष्टि, मृत्यु २७:१० प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण २९ शके १९४६
दिनांक = २०/०८/२०२४
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
संगत योग्य आहे काय ह्याचा विचार करा. प्रवास संभवतात. वरिष्ठ अधिकार्याची गाठ पडेल. संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल. खर्चात वाढ होऊ शकते.
वृषभ
जुने वाद संपुष्टात येतील. अंगीभूत कुशलता योग्य जागी वापरा. भौतिक सुखाच्या साधनात वाढ होईल. आपलेच मत समोरच्या व्यक्तिला पटवून द्या. दिवस आनंदात घालवाल.
मिथुन
व्यायामाला नव्याने सुरवात करा. उत्तम भाषाशैली वापराल. व्यवसायात एखादा प्रयोग कराल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. बचतीच्या योजना आखाल.
कर्क
अति हळवे होऊ नका. भौतिक सुखात वृद्धी होईल. कौटुंबिक सुखात वाढ होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल.
सिंह
तुमची लोकप्रियता वाढेल. जुने छंद जोपासावेत. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. वरिष्ठांशी योग्य ताळमेळ राहील. आत्मविश्वास वाढीस लागेल.
कन्या
श्रमाला घाबरून चालणार नाही. उगाचच कच खाऊ नका. व्यसनांपासून दूर रहा. विरोधक नरमाईने घेतील. डोकेदुखीचा त्रास संभवतो.
तूळ
अनाठायी बडबड टाळावी. झोपेची तक्रार जाणवेल. आपले वागणे लोकांना चमत्कारिक वाटेल असे वागू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराचा वरचष्मा राहील.
वृश्चिक
आरोग्यासाठी हितकारक अशा गोष्टी लक्षात घ्या. प्रत्येक कामात उगाचच ढवळाढवळ करू नका. ज्येष्ठ व्यक्तींची गाठ पडेल. एका भेटीमुळे अनेक कामे मार्गी लागतील. रूचकर पदार्थांचा आस्वाद घ्याल.
धनू
आपला लोकसंग्रह वाढीस लागेल. जवळचा प्रवास सुखकारक होईल. अविवेकाने वागू नका. क्रोध वृत्तीत वाढ होईल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल.
मकर
नवीन जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा. इतरांना आनंदाने मदत कराल. गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध ठेवा. जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.
कुंभ
खोल विचार करण्याची तयारी ठेवा. प्रलंबित कामे मार्गी लागतील. दिवस मनाप्रमाणे घालवाल. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल. कौटुंबिक सदस्यांचे सहकार्य लाभेल.
मीन
जोडीदाराची प्रगती दिसून येईल. कौतुकासाठी काही काळ वाट पहावी लागेल. धार्मिक कामात रस घ्याल. मौसमी आजारापासून काळजी घ्या. पथ्यपाणी चुकवू नका.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर
l