अकोले तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील राजुर, इंदोरी फाटा, आणि विरगाव, देवठाण कोतुळ या ठिकाणी खुलेआम अवैध दारू विक्री चालू असून खुलेआम मटका देखील सुरू आहे नवीन आलेल्या तहसीलदार व अकोले राजूर येथील पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून अकोले तालुक्यातील अवैध दारू आणि मटका तातडीने बंद करा अन्यथा तहसील कार्यालयासमोर दारूबंदी आंदोलनातील सर्व कार्यकर्त्यांचे वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची जबाबदारी पर्यायाने प्रशासनाची राहील. असा इशारा देण्यात आला आहे
राजुर गावात 2005 सालापासून संपूर्ण दारूबंदी असतानाही गावात खुलेआम अवैध दारू व मटका कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे ज्या बीट अंमलदाराच्या हद्दीमध्ये अवैध दारू व मटका चालू असेल अशा बीट अंमलदारांना निलंबित करा ग्रामसभेत झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करा, राजूर ही पेसाची ग्रामपंचायत असतानाही अनेक महत्त्वाचे ठराव होऊन देखील कोणतीही कारवाई केली जात नाही यामागे नेमके गौड बंगाल काय? अवैध दारू आणि मटक्याची जबाबदारी स्वीकारून खरंच राज्यकर्ते राजीनामे देतील काय या व अन्य मागण्यासाठी झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करण्यासाठी लवकरच एक निर्णय आंदोलन घेण्यात येईल.
उठा ,जागे व्हा, कारवाई करा नाहीतर राजीनामे द्या बोलघेवडेपणा बंद करा, पदाचा दुरुपयोग करणे बंद करा अन्यथा सर्वसामान्य जनतेच्या तळतळाटाला सामोरे जावे लागेल.असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष मुतडक, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते विजय पवार यांनी दिला आहे