इतर

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अधिवेशन पाचोरा येथे उत्सवात संपन्न


जळगाव प्रतिनिधी

राज्य पत्रकार संघाच्या वतीने जी संवाद यात्रा काढली त्या संवाद यात्रेमध्ये युती सरकारकडे जेवढ्या मागण्या केल्या आहेत तेवढ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे तातडीने बैठक लावून यासाठी पाठपुरावा करणार असल्याची मत भडगाव पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांनी काल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खानदेशी विभागीय अधिवेशनात व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्य पत्रकार संघाचे सरचिती डॉक्टर विश्वास आरोटे होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा मराठवाडा संपर्कप्रमुख कुंडलिक वाळेकर. धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत संजय फुलसुंदर.. जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते…. राज्य पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तुत्वान सन्मान भूमिपत्रांचा करण्यात आला यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्य पत्रकार संघाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.. 1000 पत्रकारांना विमा. ट्रॅक सूट घड्याळ व विविध साहित्याचे वितरण करण्यात आले

पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खानदेश विभागातर्फे पाचोरा शहरात स्वामी लॉन्स येथे 29 ऑगस्ट रोजी विभागीय अधिवेशन संपन्न झाले
राज्य पत्रकार संघाचे विभागीय अधिवेशन पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन संपन्न झाले यावेळी
महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष,प्रविण सपकाळे,विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा,कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, उपाध्यक्ष भुवनेश दुसाने, उपाध्यक्ष डॉ. प्रा. विजय गाडे संपर्कप्रमुख,राकेश सुतार,ग्रा. जिल्हाध्यक्ष नागराज पाटील …. जळगाव जिल्हा अध्यक्ष भूषण महाजन रावेर जिल्हाध्यक्ष नवले.जिल्हापाध्यक्ष. नंदकुमार शेलकर, जिल्हा संघटक महेंद्र सूर्यवंशी,पाचोरा ता. अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे,भडगाव ता. अध्यक्ष अशोक परदेशी,चाळीसगाव ता.अध्यक्ष गफ्फार मलिक,अंमळनेर ता. अध्यक्ष समाधान मैराळे,भगवान मराठे,गणेश रावळ, आदि मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली,या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र भरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली असून पाचोरा भडगाव अमळनेर तालुक्यातील १९ मान्यवरांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले, पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक शांताराम सोनजी पाटील यांना जिवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले,पाचोरा भडगाव विधानसभा चे आमदार किशोर अप्पा पाटील यांना विधानसभा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित तर शांताराम चौधरी, यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले,यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ खानदेश विभागीय अधिवेशनासाठी पाचोरा येथे आलेल्या पत्रकारांना मोफत ट्रॅक सूट, घड्याळ,व विमा,वितरण करण्यात आले.तर विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या संकल्पनेतून यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी ७०पत्रकारांनी रक्तदान केले!
कार्यक्रमाच्या शेवटी, पत्रकार संघाने दिवंगत पत्रकार प्रमोद सोनवणे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून पत्रकार संघाकडून 11 लाख रुपयांचे विमा कवच तसेच पत्रकार संघाकडून 51 हजार रुपये आर्थिक सहाय्य प्रदान केले. यासोबतच, आमदार किशोर पाटील यांनी देखील 51 हजार रुपयांची मदत केली. दिवंगत प्रमोद सोनवणे यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी पत्रकार संघाने घेतली आहे. राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे आणि किशोर रायसाकडा यांनी ही घोषणा केली.
………….
स्व. प्रमोद सोनवणे यांच्या मातोश्रींच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले तेव्हा डॉ. विश्वासराव आरोटे ह्यांनी त्यांना धीर दिला तसेच संपूर्ण पत्रकार संघाने त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचे वचन दिले. हा क्षण उपस्थितांच्या मनात खोलवर ठसला.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाद्वारे आयोजित केलेल्या अधिवेशनाला खांदेश विभागा तील असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाला खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, उपाध्यक्ष भुवणेश दुसाने,कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, संपर्काप्रमुख. राकेश सुतार,पाचोरा ता. अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे,शहराध्यक्ष. राजेंद्र खैरनार,
उपाध्यक्ष स्वप्निल कुमावत,
इलेक्ट्रॉनिक मीडिया तालुकाध्यक्ष गजानन लाधे, भालचंद्र राजपूत भडगाव पत्रकार हल्ला कुर्ती समिती शहराध्यक्ष मुझम्मील शेख, चेतन महाजन,अलीम शाह, कसोद्याचे.सागर शेलार,
यशस्वी करण्यासाठी यांनी परिश्रम घेतले तर नामांकित विधीतज्ञ कविताताई मासरे (रायसाकडा)
यांनी मोठे योगदान संघटनेला दिले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button