नॅब’तर्फे शिक्षक वृंदांचा ऋणनिर्देश व सत्कार समारंभ संपन्न*

नाशिक प्रतिनिधी
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब),बेळगाव ढगा, नाशिक येथे 56 हजार चौ.फुटांचे ज्येष्ठ व अंध ज्येष्ठ नागरिकांकरिता वृद्धाश्रम तसेच अंध विद्यार्थ्यांसाठी वसती गृह बांधत असून या कार्यासाठी दरवर्षीप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील 451 शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून गोळा केलेल्या निधीबद्दल शिक्षक वृंदांचा ऋणनिर्देश व सत्कार समारंभ ‘नॅब’ ने आयोजित केला होता.
यावेळी विविध शाळांच्या मुख्याध्यापकांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मच्छिंद्र देशमुख होते.यावेळी व्यासपीठावर’नॅब’ चे संस्थापक अध्यक्ष अॅड.प्रकाशचंद्र सुराणा ,’नॅब’ च्या अध्यक्षा अॅड. विद्युल्लता तातेड, सेक्रेटरी शीतल सुराणा, डॉ. गौरव सामनेरकर, आनंद चोरडिया , निर्मला बेन शहा मोहनलाल लोढा ,विजय टाटिया, अनिल चव्हाण, रंजना बलदोटा आदी उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम रोटरी हॉल, गंजमाळ ,नाशिक येथे संपन्न झाला.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संगीता शहा यांनी नवकार महामंत्र म्हटले. ‘नॅब’ च्या अध्यक्षा विद्युल्लता तातेड यांनी ँ’नॅब’ च्या कार्याची माहिती देऊन अंध ज्येष्ठ व ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधण्यात येत असलेल्या वृद्धाश्रम व वसतीगृहासाठी उदारहस्ते देणगी देणाऱ्या दानशूर व्यक्तींचे तसेच मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांचे ऋणनिर्देश व्यक्त करून सर्वांनी या कार्यासाठी सढळ हाताने देणगी देण्याचे आवाहन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड .प्रकाशचंद्र सुराणा यांनी ‘नॅब’ च्या 35 वर्षांच्या कार्याचा आढावा घेऊन देणगीदारांनी दिलेल्या भरघोस देणग्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .श्री मच्छिंद्र देशमुख यांनी ‘नॅब’ चे कार्य अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले .अभिनव बाल विकास मंदिर, गंगापूर रोड, नाशिकच्या मुख्याध्यापिका सौ. मीनाक्षी गायधनी यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांच्या वतीने सत्काराला उत्तर दिले .तसेच डॉ. गौरव सामनेरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीमती निर्मला बेन शहा यांनी त्यांच्यातर्फे श्री रवी राजन या अंध बांधवाला वजन काटा भेट दिला.’नॅब’ चे सेक्रेटरी शितल सुराणा तसेच विजय टाटिया यांनी देणगीदारांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए लोकेश पारख यांनी केले .अनिल चव्हाण यांनी आभार मानले या कार्यक्रमास मंगळचंद साखला, शोभा छाजेड, अॅड कांतिलाल तातेड,हेमंत देशपांडे , संगीता



