बालशिवाजी’ वेशभूषा करा.!..जिंका आकर्षक बक्षीसे.!!

‘
सोलापूर – छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि सरस्वती अकॅडमी ऑफ अकौंटन्सी यांच्या संयुक्त अभिनव उपक्रमाद्वारे वय वर्षे ५ ते १० वर्षांपर्यंतच्या सर्वच धर्मातील लहान मुले – मुलींसाठी ‘बालशिवाजी वेशभूषा’ सर्धेचे आयोजन केल्याची माहिती सरस्वती अकॅडमी ऑफ अकौंटन्सीचे संचालक प्रा. मल्लिकार्जुन परळकर यांनी दिली आहे.
या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. वय वर्षे ५ ते १० वर्षांपर्यंतच्या लहान मुले – मुलींना ‘बालशिवाजी’ वेशभूषेत पालकांनी दिलेल्या वेळेत घेऊन येणे. हि स्पर्धा नि:शुल्क (विनामूल्य) असून रविवार दि. १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी १०. ३० ते ११. ३० या वेळेत पूर्व भागातील साखर पेठेतील भू. म. पुल्ली कन्या प्रशाले जवळ असलेल्या सरस्वती अकॅडमी ऑफ अकौंटन्सी येथे उपस्थित रहायचे आहे. या स्पर्धेत मुले व मुली दोन्हीही सहभागी होऊ शकतात. ‘परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल’. वयाच्या पुरावासाठी आधारकार्ड आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी 9890933381 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावेत. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आणि ५ उत्तेजनार्थ पारितोषिके सरस्वती अकॅडमी ऑफ अकौंटन्सीच्या वतीने देण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घ्यावेत, पालकांनी आपल्या पाल्यांना प्रोत्साहीत करावे, असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा, उपाध्यक्ष नागेश पासकंटी, श्रीनिवास कामूर्ती, नागेश सरगम, सल्लागार सुकुमार सिध्दम, दयानंद कोंडाबत्तीनी, लक्ष्मण दोंतूल, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी यांनी केले आहे.
