रोटरी क्लब ऑफ नाशिक चा नवीन सभासदांचा रोटरी प्रवेश सोहोळा उत्साहत संपन्न

नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिक चा नवीन सभासदांचा रोटरी प्रवेश सोहोळा ३० ऑगस्ट रोटरी हॉल गंजमाळ येथे उत्साहात संपन्न झाला
नवीन सभासद रोटरी कुटुंबात सामील झाले. सर्व जुन्या सभासदांनी नवीन सभासदांचे अतिशय उत्साहात स्वागत केले. माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रमेश मेहेर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
त्यांनी अतिशय थोडक्या शब्दात नविन सभासदांचे स्वागत केले अणि त्यांना रोटरी मधील जवाबदारी समजाऊन सांगितली.या नंतर मराठी संगीताचा कार्यक्रम रागिणी कामतीकर ह्यांच्या शिष्यांनी सादर केला.
रोटरी क्लब ऑफ नाशिक चे अध्यक्ष ओमप्रकाश रावत ,सचिव प्रशासन शिल्पा पारख,सचिव प्रकल्प हेमराज राजपूत ,नियोजित अध्यक्ष गौरव सामनेरकर ,संचालकविजय दीक्षित ह्यानी नूतन सभासद ह्यांना ८० वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या विवध उपक्रमात आपले योगदान देण्याचे आव्हान केले.
किशोर सुतार विठ्ठल वाकडे,लीना बाकरे अमित रुद्रे,डॉ विश्वजित दळवी,रोहित देशपांडे, डॉ महेंद्र देशपांडे सुकृत करंजकर
निलेश अग्रवाल,आदिती अग्रवाल, विवेक वाणी, भूषण अमृतकर
भारत बिरारी मयूर चिंधडे,सचिन करमासे, लीना कुलकर्णी,नताशा जाओरावाला ह्या नूतन सदस्यांना सभासदत्वाचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

राजेश्वरी बालाजीवाले, गौरी कुलकर्णी ,लीना बाकरे ह्यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. पराग जोशी, दमयंती बरडिया ,सुचेता महादेवकर,मोना सामनेरकर , वैशाली रावत ह्यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.
आभार प्रदर्शन सचिव शिल्पा पारख ह्यानी केले.