राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि०३/०९/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १२ शके १९४६
दिनांक :- ०३/०९/२०२४,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४०,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अमावास्या समाप्ति ०७:२६,
नक्षत्र :- पूर्वा समाप्ति २७:१०,
योग :- सिद्ध समाप्ति १९:०५,
करण :- किंस्तुघ्न समाप्ति २०:३४,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पूर्वा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- अमावास्या वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:३४ ते ०५:१७ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५५ ते १२:२८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:२८ ते ०२:४१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:३४ ते ०५:०७ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
इष्टि, प्रतिपदा श्राद्ध, मंगळागौरी पूजन,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १२ शके १९४६
दिनांक = ०३/०९/२०२४
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा. घाईने कामे उरकू नका. सहकार्‍यांच्या हातात हात घालून चला. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. गुरुतुल्य व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल.

वृषभ
अकारण पैसा खर्च होऊ शकतो. दिवस उर्जावर्धक राहील. कष्टाला पर्याय नाही. कामे गतीने पूर्णत्वास जातील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.

मिथुन
मित्रांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. खाण्यापिण्याची चंगळ राहील. जवळचा प्रवास चांगला राहील. कामाचा अधिक भार येऊ शकतो. जोडीदाराच्या प्रगल्भतेचे कौतुक कराल.

कर्क
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. चटपटीत पदार्थ खाल. हातातील अधिकार योग्य वेळी वापरा. नातेवाईकांची गाठ पडेल. जोडीदाराच्या भावना लक्षात घ्या.

सिंह
जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. व्यायामाचा कंटाळा करू नका. भावंडांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दिवस आपल्या इच्छेप्रमाणे घालवाल.

कन्या
आपल्या कामात यश मिळेल. नियोजनबद्ध कामे कराल. आवडीची कामे करण्यावर भर द्याल. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. जोडीदाराशी समजूतदारपणे वागा.

तूळ
कौटुंबिक खर्च निघतील. कामाची क्रमवारी ठरवा. बोलण्यातून लोकांवरती प्रभाव पाडाल. झोपेची तक्रार जाणवेल. समस्यांना संयमाने तोंड द्या.

वृश्चिक
लोक तुमचा सल्ला विचारायला येतील. अधिकार्‍यांच्या सल्ल्याने वागा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. फक्त कामावरच लक्ष केन्द्रित करा. आर्थिक चिंता मिटेल.

धनू
मदत केल्याचा आनंद मिळवाल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. परोपकाराची भावना जोपासाल. तरुणांच्या सहवासात रमाल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील.

मकर
नोकरीत सांभाळून निर्णय घ्या. व्यवसायात चांगली कमाई कराल. धार्मिक भावना वाढीस लागेल. गरज नसेल तर प्रवास टाळावा. भावंडांशी मतभेद टाळा.

कुंभ
मनातील निर्णय जोडीदारासमोर मांडा. तिखट शब्दांचा वापर टाळा. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. जुन्या विचारांना चिकटून राहू नका.

मीन
क्षुल्लक गोष्टी नजरेआड करा. जोडीदाराशी शांतपणे वार्तालाप करा. अती उत्साह दाखवायला जाऊ नका. योग्य संधीची वाट पहावी. उष्णतेचे त्रास संभवतात.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button