काळेगाव शाळेचे शिक्षक लक्ष्मण पिंगळे यांना शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव – नेवासा राज मार्गावरील भातकुडगाव फाटा नजीक असलेल्या पुनर्वसीत काळेगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक लक्ष्मण नागनाथ पिंगळे यांना शिक्षक दिनाचे अव औचित्य साधून शिक्षक रत्न हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
काळेगाव शाळेतील शिक्षक पिंगळे हे अतिशय कष्टाळू व प्रामाणिक शिस्तबद्ध शिक्षक म्हणून परिचित आहेत.जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शाळाबाह्य वेळेमध्ये जास्तीचे तास घेऊन विद्यार्थ्यात गुणवत्ता वाढीसाठी अधिक प्रयत्न करणारे शिक्षक म्हणून ओळखले जातात.
या शाळेत चार ते पाच किलोमीटर अंतरावरून विद्यार्थी व विद्यार्थिनी येतात शाळेची गुणवत्ता चांगली असून विद्यार्थी संख्याही मोठी आहे. लवकरच शाळेचा चेहरा मोहरा बदलण्याचा मानस शाळेचे मुख्याध्यापक संदीप आहेर व लक्ष्मण पिंगळे यांचा असून त्या दृष्टीने त्यांचे काम चालू आहे याच कामाची दखल घेऊन टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमांमध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भायगाव ग्रामपंचायतचे सरपंच युवा नेते राजेंद्र आढाव,कामगार पोलीस पाटील बबन सौदागर, गटशिक्षण अधिकारी श्रीमती तृप्ती कोलते, विस्तार अधिकारी शंकर गाडेकर, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर जाधव,शाळेचे मुख्याध्यापक संदीप आहेर,अनिल लांडे, संभाजी कडूस,रामेश्वर शेकडे गणेश दुकळे, संदीप लांडे, सुरज सौदागर,नामदेव लोखंडे,प्रदीप लांडे,पत्रकार शहाराम आगळे, गणेश शेकडे, उद्धव लांडे, राम सौदागर,गणेश पवार,नितीन काळे,तुकाराम शेकडे,गणेश लोखंडे,नामदेव पालवे,अंबादास सांगळे यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे.