इतर
शासकीय सेवेत असताना स्वस्त धान्याचा लाभ घेतला तहसीलदारांनी केली १.लाख ३४ हजार दंडाची कारवाई
अमळनेर : शासकीय सेवेत असताना देखील केशरी कार्डवरील
स्वस्त धान्याचा लाभ घेतल्याप्रकरणी एका कुटुंबाला तहसीलदार
रुपेशकुमार सुराणा यांनी १ लाख ३४ हजार ४८७ रुपयांचा दंडाची कारवाई केली आहे सदर दंडाचा भरणा भरणा १५
दिवसांच्या आत करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रदीप सुखदेव पाटील, मेघा सुखदेव पाटील, संदीप सुखदेव पाटील हे
शासकीय सेवेत असताना देखील २०१२पासून शासन नियमानुसार स्वस्त धान्याचा लाभ घेत होते.
याबाबत सुमित प्रदीप पाटील यांनी तहसीलदार
रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे केली।होती. सुराणा यांनी याबाबत सखोल चौकशी करून दंडाची कारवाई केली आहे