इतर

शिडवड( ता अकोले) गावात शेतकऱ्याने केला ,नंदया बैलाचा दशक्रिया विधी!

अकोले प्रतिनिधी

नंद्याच्या कष्टातुन उतराई होण्यासाठी, नंद्या बैला, चा। त्यांचे मृत्यूनंतर पारंपारिक पद्धतीने अंत्य विधीं केला नंतर दहा दिवसाचे सुतक पाळून एका सत्तर वर्षाच्या शेतकऱ्याने नंद्या बैलाचा दशक्रिया विधीही केल्याची घटना शिडवड ता अकोले येथे घडली

अकोले तालुक्यातील शिदवड येथील किसन रामभाऊ गिरे आदिवासी शेतकरी आहे अतिशय गरिबीतुन त्यांनी आपला प्रपंच केला पाच मुले दोन मुली असे त्यांचे कुटुंब त्यांनी घरच्या गाय गोठ्यातील नंदया बैल तब्बल 27 वर्षे सांभाळला

गिर्हे यांचे परिवारात घरच्या गावरान गाई पासून नंद्याचा जन्म झाला लहानपणापासून त्याचे पालन पोषण करत त्याच्याकडून नांगरट करून घेतले घरातील सर्वच लहान मोठ्यांचा नंद्या हा लडका बैल होता नंद्याच्या चारा पाण्यापासून सर्वच त्याची काळजी घेत
कुटुंबाची भरभराट नंदया पासून झाल्याने या शेतकऱ्याने नंद्याला बाजारचा रस्ता कधी दाखवला नाही 27 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला त्याचा अंत्य विधी पारंपारिक पद्धतीने केला आणि दहा दिवसानंतर त्याच्या दशक्रिया विधीचा देखील कार्यक्रम पार पाडला लिंगदेव येथील बैरागी या पुरोहिताने त्याचा दशक्रिया विधी विधिवत केला घरातील सर्वांनीच नंदया चे दहा दिवसाचे सुतक पाळले दहाव्या दिवशी ह भ प विश्वनाथ महाराज शेटे यांचे प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी त्यांनी “धर्मनिती पशुपक्षी पालना” भूतदया पशुचे पालन ” तान्हेल्या जीवना माझी या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे निरूपण यावेळी शेटे महाराजांनी आपल्या प्रवचनातून केले आणि प्राणी पशुपक्ष्यांवर दया करा असे आवाहन त्यांनी केले

याप्रसंगी पिंपळगाव खांड सोसायटीचे चेअरमन आत्माराम शेटे, दशरथ शेटे, ज्ञानेश्वर ढगे, शरद ढगे, बाळासाहेब ढगे, अशा परिसरातील 200 पेक्षा अधिक ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सर्वच उपस्थितांना दशक्रिया विधी निमित्ताने भोजन दिले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button