प्रगतिक शिक्षण संस्थेच्या नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रगतीमध्ये मानाचा तुरा –

-राजापूर विद्यालय, महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापिका श्रीमती साई सुधा वनम आणि सविता हासे घोलप यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत घेतली जाणारी पत्रकारितेची पदवी उत्कृष्ट गुणांनी प्राप्त करून संगमनेर महाविद्यालयामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळवला आहे. आपल्या रोजच्या शैक्षणिक क्षेत्रातलं काम करत असताना स्वतःची जिज्ञासा आणि चिकाटी याचे हे अनमोल उदाहरण आहे. विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिक्षकांनीही त्यांच्यासमोर काही आदर्शवत ठेवण्यासारख्या गोष्टी करायला हव्यात याच उद्देशाने या दोन्ही प्राध्यापिकांनी पत्रकारिता पदवी प्राप्त करून त्यांच्या शैक्षणिक भंडारा मध्ये वाढ केलेली आहे. त्यांच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी प्रागतीक शिक्षण संस्थेचे, नूतन आर्ट कॉलेजचे विद्यमान प्राचार्य डॉ.सुभाष कडलग सर यांनी या दोघींचाही यथोचित सत्कार आयोजित केला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.अनिल गोडसे साहेब, श्री.कैलास हासे साहेब (सेक्रेटरी ),उपाध्यक्ष- श्री.आर पी नाना हासे, स्कूल कमिटी चेअरमन -श्री.भाऊसाहेब हासे, संचालक श्री.भानुदास सोनवणे , श्री बाबासाहेब गायकर विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य खतोडे आर एम सर, जूनियर कॉलेज इन्चार्ज- नवले सर , श्रीमती अभंग मॅडम, श्रीमती तळेकर शितल मॅडम ,सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्वांचे प्राध्यापक वर्पे एस. एन. यांनी आभार मानले.