अकोले प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघ आयोजित हिंदी दिना निमित्त पुरस्कार वितरण समारंभ श्री साईबाबा कन्या मंदिर हॉल ५००रूमच्या समोर शिर्डी ता.राहाता येथे संपन्न झाला.
अकोले तालुक्यातील सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरे येथील प्राचार्य मधुकर मोखरे यांना आदर्श गुणवंत हिंदी अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगि हिंदी अध्यापक सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम पगारे,उपाध्यक्ष रमजान सय्यद,सचिव सुरेश गोरे, सहसचिव एकनाथ जाधव,विश्वस्त राजाराम टपले,खजिनदार बाळासाहेब नवले,डॉ. संजय दवंगे,मिलिंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
२७ वर्षे अविरतपणे हिंदी, समाजशास्त्र विषयाचे अध्यापन करणारी व महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षामध्ये नेहमी पुढे असणारे व नेहमीच शंभर टक्के निकाल असणारे एक ज्ञानपीपासून व्यक्तिमत्त्व म्हणजेच श्री.मोखरे सर.त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची दखल घेत जिल्हा अध्यापक सेवा संघाने दिलेला पुरस्कार खरोखरच वाखान्याजोगा आहे.या कार्याबद्दल सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख,सचिव एम.एल. मुठे,कोषाध्यक्ष विवेकजी मदन सर्व संचालक,आजी,माजी प्राचार्य, ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले आहे.
——-
[आदर्श गुणवंत पुरस्कारामुळे विद्यार्थ्यांप्रती शैक्षणिक क्षेत्रात जबाबदारी अधीक वाढली आहे.माझ्या अध्यापन कार्यात निश्चितपणे अधिक योगदान कसे देता येईल हेच माझे मी कर्तव्य समजून ज्ञानदान करीत राहील-प्राचार्य मधुकर मोखरे]