लंपि साथीचे मोफत लसीकरण करा – सुशांत आरोटे

अकोले प्रतिनिधी :-
अकोले तालुक्यात सध्या जनावरांच्या लम्पी आजाराचे साथ असून जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग यांनी नियोजन करून साथ आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गावा गावात जनजागृती करून मोफत लसीकरण मोहीम हाती घ्यावी.
पशुसंवर्धन विभाग आणि आधिकरी कर्मचारी वर्ग अकोले तालुक्यात आलेल्या लपी साथीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विभागांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत.परंतु शेतकरी बांधवांना पशुधन वाचवण्यासाठी या साठी पासून वाचण्यासाठी पशुसंवर्धन विभाग आणि या ठिकाणी असलेल्या सहकारी दूध संघ प्रयत्न करत आहेत.या तालुक्यात अनेक खाजगी संघ मोठ्या प्रमाणावर दूध खरेदी करून प्रचंड नफा कमावत आहेत.या सर्व खाजगी संघ यांनी पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या मोफत लसीकरण करण्यासाठी येथील शेतकऱ्यांसाठी मोफत लस उपलब्ध करून द्यावे असे आवाहन अकोले तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
तालुक्यात असलेल्या सर्वच खाजगी दूध संघ यांनी आपल्या आपल्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना जरी मोफत लसीकरण करण्यासाठी संघटित प्रयत्न करावेत.
असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशांत आरोटे,उपाध्यक्ष सुनील पुंडे, कार्याध्यक्ष सुरेश नवले, युवक तालुकाध्यक्ष शुभम आंबरे,ग्रामपंचायत सदस्य श्री पोपट आहेर,सोमनाथ आहेर,प्रशांत उगले,प्रवीण आहेर,अशोक दातिर, शेणकर सर,आदी कार्यकर्त्यांसह शेतकरी वर्गाने केली आहे.