मुख्यालयी न थांबता घरभाडे घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्या वर कारवाई साठी नेवासा त उपोषण सुरू

दत्तात्रय शिंदे/ माका प्रतिनिधी
मुख्यालयी न थांबता घरभाडे घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्या वर कारवाई साठी नेवासा त उपोषण सुरू करण्यात आले
दिनांक २७/३/२०२३ पासून पंचायत समिति, नेवासा जिल्हा अहमदनगर या कार्यालयासमोर समाज हिताच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन करणार सुरु केले आहे आंदोलनातील प्रमुख मागण्या
1) अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच पंचायत समितिमधील कार्यरत असणार्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक यांचे मुख्यालयी राहत असल्याचे ग्रामसभेचे ठराव अजूनही जमा झालेले नसताना तसेच मुख्यालयी राहत असल्याचे ग्रामसभेचे ठराव देण्यापूर्वीच त्यांच्या संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी सन २०१९ पासूनचे त्यांचे घरभाडे दर महिन्याला बेकायदेशीरपणे मंजूर केले असून त्या सर्वांवर कारवाई होण्यासाठी दि १५/१२/२०२२ रोजी जि. प. अहमदनगर आणि पं.स.मध्ये ईमेलद्वारे केलेल्या तक्रारिनुसार अजूनही दोषींवर झालेली नसून दि १५/१२/२०२२ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार चौकशी, तपासणी करून त्या चौकशी अहवालनुसार सर्व दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा. २) जिल्हा परिषद प्राथ शाळा कांगोणी ता नेवासा येथील कार्यरत सर्व शिक्षक, मुख्याध्यापक हे अजूनही मुख्यालयी राहत नसताना ते सर्व नियुक्ती दिनांकापासून मुख्यालयी राहत असल्याचा खोट्या माहितीचा ग्रामसभेचा ठराव मंजूर करणार्यांची चौकशी व कारवाई होण्यासाठी वेळोवेळी लेखी तक्रारी केल्या असून तरीही त्या तक्रारिंनुसार संपूर्ण चौकशी न करता जाणीवपूर्वक अर्धवट चौकशी करून बनावट चौकशी अहवाल बनविले जात आहे त्यामुळे राहिलेली चौकशी पूर्ण होण्यासाठी मा. गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग(प्राथ), पंचायत समिति, नेवासा येथे दि १२/१२/२०२२ रोजी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार राहिलेली चौकशी तातडीने पूर्ण करून शासनाची फसवणूक, भ्रष्टाचार करणार्यांवर कारवाई करण्यात यावी.

3) ग्रामपंचायत कांगोणी ता. नेवासा येथील सन २०१५-१६ आणि सन २०१६-१७ या दोन आर्थिक वर्षाच्या लेखा परीक्षण अहवालात घेतलेल्या आक्षेपांची पूर्तता न करता तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आणि तत्कालीन सरपंच यांनी त्या दोन वर्षाचे लेखा परीक्षण पूर्तता अहवाल पंचायत समिति नेवासा येथे देऊन शासनाची फसवणूक केली होती त्यामुळे त्यानुसार चौकशी, तपासणी होण्यासाठी वेळोवेळी तक्रारी तसेच संदर्भ क्र १ नुसार तक्रारी केल्या असून त्या तक्रारीनुसार अजूनही पुर्णपणे चौकशी व तपासणी झालेली नसून त्याबाबत केलेल्या तक्रारिंनुसार लेखा परीक्षण अहवालात घेतलेल्या आक्षेपांच्या पूर्ततेबाबत तातडीने राहिलेली चौकशी व तपासणी करून भ्रष्टाचार, शासनाची फसवणूक करणार्यांवर कारवाई करण्यात यावी.