तुम्ही बाहेर भेटा तुमच्या डोक्यातच दगड घालतो!

मुख्यध्यापकांना धमकी देणाऱ्या चौघां शिक्षकांवर गुन्हा दाखल
अकोले प्रतिनिधी
तुम्ही शाळेच्या बाहेर भेटा तुमच्या डोक्यातच दगड घालतो अशी दमबाजी करणाऱ्या शाळेतील चार शिक्षकांवर राजुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यानुसार पोलिसांनी एकदरे येथील अनुदानित आश्रम शाळेतील चार शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे
अकोले तालुक्यातील एकदरे येथील अनुदानित आश्रम शाळेतील मुख्याध्यापक विक्रम सुधाकर आरोटे यांनी राजुर पोलिसांत फिर्याद दिली आहे यानुसार राजूर पोलिसांनी भा. द. वी. कलम ५०४,५०६, प्रमाने गुन्हा दाखल केला आहे
तुम्ही आदेश पाळत नाही असे शिक्षकांना विचारले असता आश्रम शाळेतील चार शिक्षकांनी संबंधित मुख्याध्यापकास शिवीगाळ करीत तुम्ही बाहेर भेटल्यावर डोक्यात दगड घालतो असा दम दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
. अकोले तालुक्यातील एकदरे अनुदानित आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विक्रम सुधाकर आरोटे (वय ४०)यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, शाळेचे कामकाज तुम्ही का करत नाही, तुम्ही आदेश पाळत नाही, व नोटीस दिली तर ती घेत नाही याची विचारणा मुख्याध्यापक विक्रम आरोटे यांनी केली असता त्याचा राग मनात धरुन एकदरे आश्रम शाळेतील शिक्षक आसाराम शंकर कानकाटे, संदिप भास्कर कोटकर,जालिंदर निवृत्ती कराळे,अरुण रामदास सोनवणे यांनी मुख्याध्यापक विक्रम सुधाकर आरोटे यांस शिवीगाळ करुन तुम्ही बाहेर भेटल्यावर तुमच्या डोक्यात दगड घालतो असा दम दिल्या प्रकरणी राजूर पोलिसांत एकदरे अनुदानित आश्रमशाळेच्या चार शिक्षकांवर भा.द.वि.कलम ५०४,५०६ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे ज्ञानदानाच्या पवित्र मंदिरात शिक्षकांमध्ये सुरू असलेल्या या वादाची चर्चा तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात चांगलीच रंगली आहे