आत्मदहन नोटीसीची वीज कंपनी प्रशासनाने घेतली दखल!
पुणे दि १८
राज्यातील महावितरण महापारेषण व महानिर्मिती या कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या समस्यां मागील 2 वर्षे पत्रव्यवहार व विविध आंदोलने करून देखील शासन स्तरावर याची दखल घेतली नाही. त्या मूळे याची नैतिक जबाबदारी घेत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या अध्यक्षांनी उर्जामंत्री व वीज कंपनी प्रशासनाला पत्र देऊन आत्मदहनाची नोटीस दिली होती.
या नोटीसीची वीज कंपनी प्रशासनाने दखल घेऊन संघटना प्रतिनिधींना आज शुक्रवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मिटिंग साठी कंपनीचे मुख्य कार्यालय प्रकाशगड, बांद्रा येथे पाचारण केले आहे.
आज वर विविध बैठका घेऊन देखील प्रशासनाने कामगारांच्या समस्या सोडवल्या नाहीत, ऊर्जामंत्री मा.ना.डॉ. नितीनजी राऊत, प्रधान सचिव ऊर्जा व महावितरण चे व्यवस्थापकीय संचालक यांनी सविस्तर बैठक घेऊ असे सांगून आपला शब्द आजवर पाळला नाही.त्या मुळे आत्मदहन नोटीस द्यावी लागली. मात्र आता दि 18 फेब्रुवारी 2022 रोजी मुख्य कार्यालय प्रकाश गड येथे प्रशासनाने चर्चेला बोलवले असल्याने महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष श्री नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश आणेराव, राहूल बोडके, सागर पवार हे केंद्रीय संघटना प्रतिनिधी हे चर्चेला जातील आत्मदहन बाबत संघटना अध्यक्ष श्री नीलेश खरात अद्याप ठाम असून चर्चेअंती निर्णय घेतला जाईल तसेच कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्न, रोजगारात स्थैर्य, ई बाबतीत सकारात्मक भुमिका प्रशासन घेईल अशी अपेक्षा संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहे
3 मार्च 2022 पासून विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार असून या अधिवेशनादरम्यान आंदोलन करण्याचा विचार पालक संघटना वीज कामगार महासंघ व कंत्राटी कामगार संघाच्या सर्व जिल्हा पदाधिकारी यांच्याशी चर्चां करून घेणार आहे.