पद्मशाली समाजाच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्या समाज कंटकाला कडक शिक्षा व्हावी !

पद्मशाली सखी संघमने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी
सोलापूर दि 20
पद्मशाली समाज हे पापभिरु आणि कष्टकरी म्हणून संपूर्ण भारतात ओळखले जाते. या समाजाचे कुलदैवत चिरंजीव महर्षी मार्कंडेय महामुनींचे नांव पुरातन काळातील अनेक ग्रंथात आढळून येतो.
नुकतेच महाराष्ट्रातील ‘नांदेड शहरात असलेल्या श्री मार्कंडेय चौकात, दूध डेअरी जवळील’ पद्मशाली समाजाच्या स्मारकाची विटंबना एका समाज कंटकाकडून झाली आहे. त्याला तेथील स्थानिक पोलीस प्रशासनाने लगेच अटकही केले असून शासनाच्या वतीने कडक शासन त्या समाज कंटकाला कडक शिक्षा व्हावी यापुढे पुन्हा विटंबना करण्याचे धाडस कोणीही करु नये. म्हणून या साठी जिल्हाधीका ऱ्यांना निवेदन देण्यात आले अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी पुढील कार्यवाहीचे आपल्या स्तरावर आदेश व्हावे. अशी मागणी सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या, मेघा इट्टम (अध्यक्षा) ,पूजा चिप्पा (सचिवा) आरती आडम (सदस्या) वनिता सुरम (सदस्या) पद्मशाली सखी संघमचे सर्व पदाधिकारी व सदस्या. यांनी निवेदनाद्वारे केली आहे