अशोकराव पांडे यांना राज्यस्तरीय आदर्श जिल्हाध्यक्ष पुरस्कार जाहीर

अकोले प्रतिनिधी := अखिल गुरव समाज संघटना महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा संघटना यांच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा राज्यस्तरीय आदर्श जिल्हाध्यक्ष पुरस्कार अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष श्री. अशोकराव पांडे यांना जाहीर झाला असून 22 जानेवारी रोजी आकुर्डी पुणे येथे त्यांना तो प्रदान करण्यात येणार आहे .
गेली पंधरा वर्षांपासून अशोकराव पांडे हे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब शिंदे, कै. स्व. माय मोहन बिराजदार साहेब व अखिल गुरव समाज संघटनेचे राज्यध्यक्ष श्री. वसंतराव बंदावणे सर यांच्या नेतृत्वाखाली अखिल गुरव समाज संघटनेच्या विविध पदांवर काम करत असताना अनेक समाजहितासाठी कामे केली. राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावरील आंदोलनात सक्रिय सहभाग, महाराष्ट्र कुठेही समाज बांधवांवर अन्याय झाला की तत्पर धावून जाणारे, समाज्याच्या न्याय हक्कासाठी लढत गेली पंधरा वर्षात सामुदायिक व्रतबंध सोहळे, तरुण पिढीसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शिबीर, अपघातग्रस्त बांधवांना तातडीची मदत, समाज बांधवांच्या अनाथ झालेल्या मुलांना समाजाकडून निधी गोळा करून त्या मुलांच्या भावी आयुष्यासाठी थोडासा हातभार लावणे, कुणाच्याही दु:खात सहभागी होणारे, महाराष्ट्रभर दांडगा जनसंपर्क असे अनेक विधायक काम करत असताना सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची जवळीक तसेच सर्व घटकातील समाज्यातील मित्रत्वाचे नाते त्यांचा व्यवसाय सांभाळून करतात. त्यांनी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस, राज्य कार्याध्यक्ष, राज्य उपाध्यक्ष अशी अनेक पद भूषविले आहे.
त्यांच्या या कामाची दखल घेत अखिल गुरव समाज संघटना महाराष्ट्र व पुणे जिल्हा संघटना यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श जिल्हाध्यक्ष पुरस्कार अशोकराव पांडे यांना जाहीर केला आहे.
त्यांना आदर्श जिल्हाध्यक्ष पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .