ग्रामीण

पिंपळगाव मोर ते वासाळीपर्यंत रस्त्याच्या कामाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते भुमीपुजन

अकोले- अहमदनगर व नाशिक या दोन जिल्ह्यांना व पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला पिंपळगाव मोर ते भंडारदरा (शेंडी) दरम्यान वासाळीफाटा पर्यंत हा तेरा किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याचा पाठपुरावा सुरू होता. अखेर हा रस्ता राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास ९८ कोटींचा निधी मंजूर झाला असून लवकरच हे काम पूर्ण होईल असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला.
हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या तोडीचा बनवण्यात येणार आहे असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. पिंपळगांव मोर ते वासाळी, शेंडी (घोटी – कोल्हार)या रस्त्याच्या भुमीपुजन प्रसंगी ते बोलत होते.

या रस्त्या बरोबरच धामणी ते बोरीचीवाडी, अधरवड आघाण वस्ती, धामणगांव ते घोटी खुर्द रस्ता, भगूर वाहाळ स्लॅब ट्रेन व रस्ता, जुना बस स्टॉप ते बेलगांव रस्ता आदी कामांचे खासदार गोडसे यांच्या हस्ते उदघाटन झाले. तालुक्यातील पिंपळगाव मोर ते वासाळी पर्यंत हा रस्ता अनेक वर्षापासुन खड्डेमय झाला होता. विशेष म्हणजे हा रस्ता कळसुबाई शिखर, भंडारदरा धरण, गडकिल्ले यासह अहमदनगर जिल्ह्याला जोडला आहे. या रस्त्यावर वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. मात्र गेल्या पाच सहा वर्षापासुन या रस्त्यावर अनेक ठीकाणी एक फुटापर्यंत खड्डे पडून संपुर्ण रस्ता खड्डेमय झाला असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये व पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी होती.
परीसरातील ग्रामस्थांनी खासदार श्री. गोडसे यांच्याकडे रस्ता बनवावा असे साकडे घातले होते. अखेर या मागणीला यश येऊन पिंपळगाव मोर ते वासाळी पर्यंत रस्त्याचे भुमीपुजन शनिवारी(ता. १२ नोव्हेम्बर रोजी ) खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड, जिल्हा प्रमुख अनिल ढिकले, उपजिल्हा प्रमुख रघुनाथ तोकडे, तालुका प्रमुख संपतराव काळे, सदानंद नवले, विलास आडके, वसंतराव डामसे, समाधान वारुंगसे, देविदास जाधव, बाळा गव्हाणे, यासह नंदू गाढवे, दिलीप पोटकुले, शिवाजी काळे, साहेबराव बांबळे, देविदास देवगिरे, मुरलीधर गातवे, समाधान सुरुडे, संदीप भोसले, बंसी गाढवे, राहुल लगड, रमेश गायकर, सुनील गाढवे, बाळासाहेब गाढवे, सदाशिव काळे, कचरू आगविले, बाळू गाढवे, तानाजी गाढवे आदी उपस्थित होते.


सदर रस्ता अकोले तालुक्यासह भंडारदरा धरण परिसरातील पर्यटनासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याने तसेच अकोले तालुक्यातील व्यापारी व शेतकरी यांचे दृष्टीने सदर रस्ता होणे गरजेचे आहे म्हणून मी सतत पाठपुरावा करत होतो आज त्याला यश आल्याने समाधान वाटते
रस्त्यासाठी निधी देऊन प्रत्यक्ष भूमिपूजन होत असल्याने अकोले तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो !

अशोकराव भांगरे

(माजी. जिल्हा परिषद अध्यक्ष ,अहमदनगर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button