अकोल्यात कष्टकऱ्यांचा सन्मान करत जादुगार हांडे फौंडेशनने साजरा केला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव !

अकोले प्रतिनिधी
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असतानाच जादूगार हांडे फौंडेउंडेशनेही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १५/०८ /२०२२ रोजी शिवाजीनगर, अकोले येथे विविध उपक्रमांसह मोठ्या थाटात साजरा केला.
माजी वन अधिकारी मा.चंद्रकांत भारमल यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. सदर प्रसंगी आयुष्याचा अमृत महोत्सव साजरे करणारे कर्तृत्ववान ज्येष्ठ नागरिक, घरकाम करणाऱ्या श्रमकरी महिला, एस.एस.सी .मार्च 2022 गुणवंत विद्यार्थी, माजी सैनिक यांचा शाल सन्मान पत्र. पुष्पगुच्छ देऊन यथोचीत सन्मान करण्यात आला. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवणे काळाची गरज आहे, प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे आणि कचरा सुद्धा ओला सुका कचरा वेगळा करून करून ठेवणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. असे भारमल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले . हांडे फौंडेशन समाज सुधारकांचा वारसा पुढे नेत देश सेवा करत असल्याचे माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी आपले विचार व्यक्त करताना नमूद केले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जादूगर हांडे यांनी आपण समाजाचे आपल्यावर अनंत ऋण असतात त्यातून उतराई होण्याचा प्रयत्न असा करावा. असा आशावाद व्यक्त केला. सदर दैदीप्यमान देखण्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक .मनोहर तळेकर, विठ्ठल आरोटे, भांगरे सर,बंगाळ सर, आनंदा विसपुते, सुखदेव शेटे,मेजर भास्कर तळेकर,मेजर भोर,मेजर जगताप, के.टी .मंडलिक ,श्रीमती एखंडे,माजी सैनिक अविनाश झोलेकर,रामनाथ कासार,सचिन नवले,रावसाहेब नवले,संदीप ताजणे आयोजक मंदाकिनी हांडे, होमगार्ड पथक माजी सैनिक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .या अविस्मरणीय सोहळ्यासचे सुंदर सूत्रसंचालन होमगार्डच्या प्रमुख पुष्पा नायकवडी यांनी केले.
