अनुसूचित जमातीचे आरक्षण अंमलबजावणी साठी रस्ता रोको आंदोलन.

सकल धनगर समाज पारनेर तालुक्याच्या वतीने निवेदन.
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी.
महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या अनुसूचीत जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणेसाठी पारनेर तहसील कार्यालयासमोर बकऱ्याचे कळप रस्त्यावर आणून आंदोलन करण्यात आले. सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य पारनेर तालुकाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी घटनेमध्ये असलेल्या अनुसूचित जमातीची अंमलबजावणी व्हावी. महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या खात्याच्या राजपत्रात अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक ३६ वर धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे. महाराष्ट्रात कोठेही धनगर अस्तित्वात नाहीत असे महाराष्ट्र शासनाच्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलेले आहे. त्याप्रमाणे धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी ताबडतोब करावी.
यासाठी पंढरपूर, लातूर, नेवासा व इतर ठिकाणी धनगर समाज बांधव आमरण उपोषणास बसलेले आहेत तरी त्याची सरकारने त्वरित दखल घ्यावी व धनगर जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी ताबडतोब व्हावी यासाठी आज दि.२३ रोजी दुपारी ०१:३० वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.