पारनेर पश्चिम भाग विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सभा खेळीमेळीत संपन्न.

दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी.
पारनेर पश्चिम भाग विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सभासदांची ६६ वी.सर्वसाधारण सभा रविवार( दि.२२ )रोजी सकाळी. ११ वाजता संस्थेचे अध्यक्ष सखाराम लक्ष्मण बुगे यांचे अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी संस्थेचे सचिव, सुरेश रोकडे यांनी सभे पुढे येणारे विषयांचा सविस्तर अहवाल सादर केला.या मध्ये अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसेडींग वाचून कायम करणे,२०२३ ते २०२४ सालची आर्थिक पत्रके वाचन, जनरल क.म.पत्रकावर सह्या करण्याचा व बँके कडे मंजुरिस पाठवण्याचा अधिकार व्यवस्थापक कमिटीस देणे, वैधानिक लेखा परीक्षणाचे वाचन करणे व दोष दुरुस्ती अहवाल पाठवणे, सन २०२२-२३ वैधानिक लेखा परीक्षण चा दोष दुरुस्ती अहवाल सादर करणे,सहकार आयुक्त व निबंधक यांनी प्रमाणित केलेल्या पॅनल मधून वैधानिक लेखा परीक्षकांची नेमणूक करणे, अंदाज पत्रकातील रकमे पेक्षा जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे, सभासद यांच्याकडे असणाऱ्या थकबाकी बाबत विचार विनिमय करणे, संस्थेच्या सभासदांना सहकार प्रशिक्षण देणे, संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे या सभासदांचे विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने दिवसे दिवस वाढत असलेल्या थकबाकी बाबत चिंता व्यक्त करण्यात आली. सभासदांची थकबाकी वसुल होणे करिता सर्व संचालकांनी सामुदायिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.
या वेळी संस्थेचे सभासद पांडुरंग भाऊ औटी ,शिवाजी विठ्ठलराव सोबले ,शिवाजी दत्तात्रय औटी ,विलास तुकारामजी मते , संचालक शरद नगरे,दत्तात्रय तुकाराम आढाव ,गणेश बाळासाहेब औटी ,सुभाष किसन देशमाने, नानाभाऊ कोंडीबा औटी,भाऊ गोपाळा शेरकर,काशिनाथ मारुती औटी ,भास्कर बजाबा औटी,रामदास देवराम कावरे ,चंद्रहंस बाबुराव देशमाने , पोपट तुळशीराम औटी , मारूती चिमाजी पानसरे ,दयानंद नामदेव सोनवणे, जिजाबाई गंगाराम शेरकर, उपस्थित असलेल्या सर्व सभासदांचे अध्यक्ष सखाराम लक्ष्मण बुगे यांनी आभार मानले.