वाटसुरू महिलेची अशा सेविका मुळे झाली सूरक्षित डिलिव्हरी!

अकोले प्रतिनिधी
वाटसरू म्हणून आलेल्या महिलेची आज आशा सेविकेच्या सतर्कते मुळे सुरक्षित डिलिव्हरी झाली डिलिव्हरी नंतर बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहे
सातेवाडी या आदिवासी भागातील विमल लहाणू मुठे ही महिला आज कोतुळ येथेआठवडे बाजार व रेग्युलर चेकअप साठी येत होती सातेवाडी हुन कोतुळ येथे खटपट नाक्यावर गाडीतून ती उतरली काही वेळातच तिचे तिचे हातपाय दुखायला लागले ती थोड्यावेळ रोडवर उभी राहिली त्यानंतर तिला वेदना होऊ लागल्या तिने रोड लगत असणाऱ्या पार्लर व्यावसायिक सौ भारती रनजीत देशमुख यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले सौ भारती देशमुख यांनी महिलेला तिला घरात आत मध्ये घेऊन बसण्यास सांगितले व पिण्यासाठी पाणी दिले तिच्या वेदना लक्षात घेऊन सौ भारती यांनी ताबडतोब आशा सेविका श्रीमती अस्मिता कोते यांना फोन केला व ही माहिती त्यांना सांगितली श्रीमती कोते यांनी लगेच धाव घेत भारती देशमुख यांचे घर गाठले
सातेवाडी हुन आलेली ही महिला आठ महिन्याची गरोदर असल्याचे प्राथमिक तपासणीत लक्षात आले आणि प्रसूती साठी तिच्या वेदना होत असल्याचे श्रीमती कोते यांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ 102 गाडीला फोन केला वाहन चालक अन्सार काजी हे क्षणांचा ही विलंब न लावता 102 गाडी घेऊन हजर झाले आणि या महिलेला पुढील उपचारासाठी तातडीने कोतूळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले वैद्यकीय अधिकारी कु श्रुती गोडे, डॉ. काटकर, परिचारिका लहामगे यांनी या महिलेवर उपचार केले व नंतर या महिलेची सुरक्षित डिलिव्हरी झाली या महिलेने मुलीला जन्म दिला बाळ आणि आई दोन्ही सुखरूप असून बाळाचे वजन १.६०० ग्रॅम असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले
आशासेविका अस्मिता कोते यांच्या सतर्क तेमुळे या महिलेची सुरक्षित प्रसूती झाली आणि वेळेत उपचार मिळाले यामुळे या कुटुंबियांनी श्रीमती कोते यांचे आभार मानले