इतर

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे ५ व ६ डिसेंबर रोजी आयोजन

अहिल्यानगर, दि.२८ – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्र यांच्यामार्फत सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालय येथे ५ व ६ डिसेंबर रोजी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवात सहभागासाठी ३ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर यांनी केले आहे.

या जिल्हास्तर युवा महोत्सवात संकल्पना आधारित बाबींमध्ये ‘विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना’ हा विषय आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत समूह लोकनृत्यासाठी वेळ मर्यादा १५ मिनीटे असून सहभागी कलाकार आणि वादकांची संख्या १० असावी. लोकगीत सादरीकरणासाठी ७ मिनीटे वेळमर्यादा असून पथकातील सहभागी कलाकार आणि वादकांची संख्या १० असावी. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत कथालेखनासाठी एक हजार शब्दमर्यादा आणि १ तास वेळमर्यादा राहील. कथा पूर्वी प्रसिद्ध झालेली नसावी.

चित्रकलेसाठी वेळ मर्यादा दीड तास असून ए-३ आकाराच्या कागदावर चित्र काढण्याची मुभा राहील. वक्तृत्व स्पर्धेसाठी ३ मिनीटे वेळ असून हिंदी व इंग्रजी भाषेत आवडत्या विषयावर विचार मांडता येतील. कविता लेखनासाठी शब्द मर्यादा ५०० शब्द आणि वेळ मर्यादा एक तास राहील. साहसी उपक्रम, आरोग्य, युवकांसाठी विशेष कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांची यूथ आयकॉन म्हणून निवड करण्यात येणार आहे. युवांनी या क्षेत्रातील आपल्या कार्याची माहिती २०० शब्दात पूर्ण पत्त्यासह द्यावी.

जिल्हास्तर युवा महोत्सवात प्रावीण्य प्राप्त केलेला संघ आणि युवा कलाकार यांना प्रावीण्य प्राप्त केल्यानुसार विभागस्तरावर आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. त्यानुसार विभागावर प्रावीण्य प्राप्त झाल्यास राज्यस्तरावर व राज्यस्तरावरून प्रावीण्य प्राप्त केल्यास राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे. तसेच प्रत्येक स्तरावर प्रावीण्य प्राप्त झाल्यास शासनाकडून प्रावीण्य प्राप्त युवा कलाकार किंवा युवा संघास रोख पारितोषिक, सहभाग व प्रावीण्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

जिल्हा युवा महोत्सवात १२ जानेवारीपर्यंत वय १५ ते २९ वर्षे असलेले युवक व युवती सहभागी होवू शकतील. जन्मतारखेबाबत सबळ पुरावा म्हणून जन्माचा दाखला जोडणे आवश्यक आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचा रहिवासी असल्याबाबतचे आधारकार्ड किंवा रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करिता नाव नोंदणी बाब निहाय https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScxEx3fXNasDGTMWvjAX9wS3Tq2eAHOmZVQRNfTCOXcRLApXw/viewform या लिंकवर दि. ३ डिसेंबर पर्यंत करावी. विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाडिया पार्क, अहिल्यानगर येथे कार्यालयात प्रत्यक्ष किंवा dsoahmednagar01@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात यावा.

अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे (९८३४११५२५५) व प्रा.सॅम्युअल वाघमारे (८७८८४१२७८०) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button