जनतेची सेवा करण्यामध्ये मोठे समाधान – सुजित झावरे पाटील

ढवळपुरीतील गावडेवाडी येथे शाळा खोल्यांचे भूमिपूजन
पारनेर/प्रतिनिधी :
ढवळपुरी येथील गावडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर शाळा खोल्याचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
सन २०२०-२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या आर्थिक नियोजनातून गावडेवाडी येथील दोन शाळा खोल्यासाठी १८.७५ लक्ष रु मंजूर करण्यात आले आहे. सदर कामासाठी ग्रामस्थांची बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती शाळा खोल्या उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना गैरसोय होत असल्याने ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांचेकडे मागणी केली होती. अवघ्या तीन महिन्याच्या आत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोन शाळा खोल्यासाठी निधी मंजूर करून दिले.
यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की, आज याठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना पाहून खरच आनंद वाटत आहे. तालुक्यातील विकास कामासाठी आपण सदैव काम करीत राहणार आहोत. जनतेची सेवा करण्यामध्ये खरे समाधान मिळत असल्याचे यावेळी सुतोवाच सुजित झावरे पाटील यांनी केले.
यावेळी बाबासाहेब खिलारी, अरुणराव ठाणगे, भरत धरम, स्वप्नील राहिंज, सुधाकर आण्णा गावडे, मा.सरपंच बबन पवार सर, बाबाजी चौधरी, शिवाजी खोडदे, चंद्रकांत गावडे, रामदास गावडे, सखाराम नरसाळे, रावसाहेब नरसाळे, बन्सी चौधरी, प्रभाकर गावडे, मनजाबापू चौधरी, राजू भुसारी, भाऊसाहेब गावडे, अशोक गावडे, भाऊसाहेब भुसारी, किरण वाळुंज, बाबू गावडे, किसन चौधरी, संदीप चौधरी, गणेश टिकल, रामदास चौधरी, अरुण गावडे संदीप चौधरी, अनिल गावडे, वैभव गावडे, बाबू गावडे, अशोक गावडे, अरुण तागड, शरद गावडे, सचिन गावडे, अनिकेत चौधरी, जि.प.प्राथ.शाळेचे सचिन नाबगे गुरुजी ( शिक्षक ) सुनिल वाबळे गुरुजी तसेच गावातील व परिसरातील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.