शिक्षणतज्ञ भाऊसाहेब आहेर वसंतस्मृती पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान

दत्ता ठुबे
पारनेर — पारनेर तालुक्यातील पळसपूर येथील ग्रामस्थ व मुंबई येथे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले आणि मुंबई येथील सेंकडरी स्कुल्स एम्प्लॉईस को ऑप क्रेडीट सोसायटीचे संचालक भाऊसाहेब आहेर सर यांना नुकताच वसंतस्मृती आदर्श पुरस्काराने सन्माननीत करण्यात आले.
भाऊसाहेब आहेर सर यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याची योगदानाची दखल घेऊन त्यांना नुकताच ठाणे येथे भाजपा आणि भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने दिवंगत वसंत डावखरे यांच्या स्मरणार्थ वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार आमदार संजय केळकर , आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते व आयोजक आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपूर्वक व भव्यदिव्य शिक्षक सन्मान सोहळ्यात देण्यात आला . त्यांच्या सन्माना चे पळसपूर परिसर व पारनेर तालुक्यात स्वागत होत आहे.
यावेळी सेकंडरी पतसंस्थेचे सचिव किशोर पाटील,भाजप शिक्षक आघाडीचे नवी मुंबई अध्यक्ष मुकेश पस्टे व इतर मान्यवर हजर होते.