इतर

महाराष्ट्रातील महाविजयाने देशाच्या राजकारणाची गाडी पुन्हा रूळावर आणण्याचं काम केलं – अमित शहा

शिर्डी:-शरद पवारांनी १९७८ पासून दगाफटक्याचं राजकारण सुरू केल्याचे शहा म्हणाले. उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये विचारधारा सोडून खोटं बोलून मुख्यमंत्री पद मिळवल्याचं ते म्हणाले. भाजप सरकार शेतकऱ्यांना मदत करून त्यांच्या समस्या सोडवण्याच्या तयारीत असल्याचे शहा म्हणाले. शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं तेसुद्धा जमिनीमध्ये गाडण्याचं काम जनतेने केल्याचं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
शिर्डीमध्ये भाजपचे राज्यस्तरीय महाअधिवेशन सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. या अधिवेशनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,
केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, पीयूषजी गोयल, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे, मंत्री आणि मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशीष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आणि भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा,गणेश नाईक, जयकुमार गोरे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, प्रकाश जावडेकर, खासदार नारायण राणे, खासदार अशोक चव्हाण, सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासह भाजपाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार भाजपचे राज्यभरातील सर्व नेते उपस्थित आहेत.


यावेळी बोलताना अमित शहांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करताने जनतेने त्यांना जागा दाखवून दिल्याचं म्हणाले, भारत माता की जय इतक्या मोठ्या आवाजाने घोषणा द्या की हा आवाज मुंबईपर्यंत गेला पाहिजे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी विजयी व्हायचं आहे. खऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही विजय मिळवला आहे. १९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं तेसुद्धा जमिनीमध्ये गाडण्याचं काम जनतेने केलं आहे. उद्धव ठाकरेंनी २०१९ ला विचारधारा सोडून दगा देत खोटं बोलून मुख्यमंत्री झाले होते त्यांनाही लोकांना जागा दाखवून दिली आहे. १९७८ पासून २०२४ पर्यंत अस्थिर राजकारण संपवत स्थिर फडणवीस सरकार देण्याचं काम केलं आहे. लोकसभेनंतर महाराष्ट्रातही विजय होईल विरोधकांच्या या स्वप्नाला धुळीस मिळवलं आहे. अनेक निवडणुका अशा असतात की देशाचं राजकारण बदलतात. माझे शब्द लक्षात ठेवा २५ वर्षांनी इतिहास साक्षी असेल महाराष्ट्रातील महाविजयाने देशाच्या राजकारणाची गाडी पुन्हा रूळावर आणण्याचं काम केलं आहे.

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांचे विशेष आभार. विजय महायुतीने विजय मिळवल्याचं सांगत अमित शहांनी शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवार इतकी वर्षे शेतकऱ्यांचे नेते राहिले, मुख्यमंंत्री होऊन गेले पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकले नाहीत. भाजप सरकार प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवल्याशिवाय राहणार नाही असंही शहा म्हणाले.

 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांनी व्होट जिहाद करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला असा विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांनी व्होट जिहाद करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला. राज्यात अराजकतावादी संघटना काम करत आहे. अराजकतावादी संघटनेविरुद्धची लढाई आता आपल्याला जिंकायची आहे, असे म्हणत तर फडणवीसांनी महायुतीच्या ऐतिहासिक विजयासाठी भाजप कार्यकर्त्यांचे विशेष आभारही मानले आहेत.


शिर्डीमध्ये भाजपचे राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनामध्ये उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी साईबाबांनी दिलेला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र भाजपसाठी महत्वाचा असल्याचे अधोरेखित केले आहे. फडणवीस म्हणाले, ‘मला आनंद आहे की पक्षाचं महाअधिवेशन शिर्डीमध्ये घेत आहोत. साईबाबांनी मंत्र दिलाय श्रद्धा आणि सबुरीचा. श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र भाजपसाठी सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्या ब्रीद वाक्यातील राष्ट्रप्रथम म्हणजे श्रद्धा आहे आणि अंती असणारा मै हा सबुरी आहे.
फडणवीस पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेने तीन वेळा भाजपला १०० पेक्षा जास्त जागा दिल्या. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये १०० पेक्षा जास्त जागा मिळवणारा एकमेव पक्ष भाजप आहे. यावेळी ज्याप्रकारचा विजय आपण प्राप्त केलाय. भाजपने भाजपप्रणित सहा राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही तिसऱ्यांदा जिंकण्याची हॅटट्रिक केली आहे.
तर पुढे फडणवीसांनी महायुतीच्या विजयाचा शिल्पकार देखील सांगितला आहे. ‘लोकसभेमध्ये ३५ टक्के मार्क्स घेऊन पास झालो. त्यानंतर ज्याप्रकारे आपण जोरदार प्रयत्न केले, महाराष्ट्रातील २८८ पैकी २३७ जागा जिंकून महाराष्ट्रात आपण इतिहास तयार केला. आता मेरिटमध्ये भाजप पास झाला. जसे महाभारतात पार्थामुळे विजय मिळाला तसेच आता या विधानसभा निवडणुकीच्या लढाईतही कार्यकर्ते पार्थ म्हणजे केशव होते आणि पंतप्रधान मोदीजी माधव होते. केशव आणि माधवामुळे आपल्याला मोठा विजय मिळाला आहे.’ असेही फडणवीसांनी नमूद केले.

श्री सद्गुरू साईबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नगरी येथे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री आदरणीय अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांचे महाविजयी प्रदेश अधिवेशन संपन्न झाले.

या प्रदेश अधिवेशनात विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीच्या पाठीशी एकजुटीने उभे राहत दिलेल्या मतरूपी आशीर्वादासाठी महाराष्ट्रवासीयांसह निवडणूकीच्या काळात अहोरात्र मेहनत करून महाविजयाचे शिल्पकार ठरलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार मानण्यात आले.

भाजपा संघटन पर्व अंतर्गत आजवर चाळीस लाखांपेक्षा जास्त महाराष्ट्रवासीयांना भाजपा परिवारात सामील करून घेण्यात यश आले आहे. नमो ॲपवर रेफरल कोड आधारित नोंदणीसाठी असणारी मर्यादा २५० वरून वाढवून ही नोंदणी मर्यादा १००० करण्यात आली आहे, याचा फायदा करून घेत जास्तीत जास्त लोकांना भाजपा परिवारात सामील करून घेण्याचा संकल्प आज हजारो भाजपा कार्यकर्त्यांनी एकमुखाने केला.

या समारंभादरम्यान भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आदरणीय अमितभाई शाह यांचा सत्कार जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डीले, मोनिका राजळे, विक्रम पाचपुते, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड यांनी केला.
या अधिवेशन नियोजनात प्रदेश पातळीवर सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, माधवी नाईक, राजेश पांडे, संजय केणेकर, विजय चौधरी, रवीजी अनासपुरे यांनी तर स्थानिक पातळीवर माजी खासदार सुजय दादा विखे पाटील, जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, अभय आगरकर, राजेंद्र गोंदकर, सीताराम भांगरे, नितीन कापसे, किरण बोराडे, योगीराज परदेशीं, रवींद्र गोंदकर, भाऊसाहेब वाकचौरे, अशोक पवार, योगेश गोंदकर, कांचनताई मांढरे, जगन्नाथ गोंदकर, यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी नियोजन केले.
कोट:-
भाजपा च मंडळ पातळी पर्यंत च भव्य दिव्य असे प्रथमच अधिवेशन संपन्न झाले.
सुजय दादा विखे पाटील हे स्वतः सर्व नियोजन करीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button