इतर

पारनेर येथे किसन बाबा चौरे यांचा पुण्यतिथी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न !

पारनेरकरांनी अनुभवला टि.व्ही.स्टार शाहीर देवानंद माळी यांचा कलाविष्कार !

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
श्री.सत्य अविनाश पारखपद समाज पारनेर आयोजित , सालाबादा प्रमाणे प. पु . सद्गुरू आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे यांचे ज्येष्ठ नातू व सद्गुरु ब्रह्मनिष्ठ हरिदास महाराज चौरे यांचे चिरंजीव परमपूज्य सद्गुरु किसन बाबा चौरे यांचा एकोनिसावा पुण्यतिथी सोहळा पारनेर येथे जामगाव रोड येथे आत्मज्ञानी गणपत बाबा मठामध्ये रविवारी संपन्न झाला .
सालाबाद प्रमाणे यावर्षी किसन बाबा चौरे यांचा महाराष्ट्रभर असणारा शिष्य सांप्रदायांनी या वर्षी पारनेर येथील आत्मज्ञानी गणपत बाबा मठ या ठिकाणी सद्गुरु किसन बाबा चौरे यांचा पुण्यतिथी सोहळा भक्तिमय व मंगलमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते.
प. पु .सद्गुरु किसन बाबा चौरे यांचे अध्यात्मिक अधिष्ठान हे वेगळ्या स्वरूपाचे होते . संसारिक जीवन जगत असताना गुरुज्ञानाचा अवलंब करून परमार्थिक सुख कशाप्रकारे अनुभवावे यासाठी सद्गुरुचा साधकाच्या जीवनात कशाप्रकारे लाभ होतो हे किसन बाबांनी आपल्या जीवनात दाखवून दिले. आत्मज्ञानी गणपत बाबांच्या अध्यात्मिक कार्यात आपले आयुष्य घालवून योग साधनेतून आनंदी जीवन कसे जगावे त्या साठी जीवनात सद्गुरु पदाचे महत्त्व काय असते याची जाणीव आपल्या शिष्य मंडळांना पटवून दिली.
संपूर्ण महाराष्ट्रभर किसन बाबांचे शिष्य मंडळ पसरलेले आहे . समाजातील जातिभेद अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती मोडण्यासाठी त्यांनी आपल्या गुरुपदाचा वापर करून शिष्य गणांना परमार्थिक सुखाची प्राप्ती करून दिली.
अहमदनगर जिल्हा सह कोल्हापूर ,सातारा , सांगली ,पुणे या सह महाराष्ट्रात विविध ठिकाणी ढोलकी डफ तुनतुन्याच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व समाज प्रबोधनपर कार्य करणारे हे सत्य अविनाश पारखपद समाज असून इतर जिल्ह्यातून हजारो भाविक भक्त हे पारनेर मध्ये या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने एकत्र जमतात व पारनेरच्या बाजारपेठेतून सद्गुरु प्रतिमेची भव्य मिरवणूकीच्या माध्यमातून अध्यात्मिक भेदिक भजने व कलगी तुऱ्याचा सामना या लोककलेच्या माध्यमातून पारनेर शहरात पारनेरकरांना अनुभवयास मिळतो.व संपूर्ण पारनेर शहर हे भक्तीमय होऊन जाते.

या कार्यक्रमाची सुरुवात दुपारी १२ ते ३ वा. पारखपद सत्संग भेदीक गायन भजनाने झाली . दुपारी ३ ते ६ वा. पारनेर शहरातुन सद्गुरू प्रतिमेची भेदीक, गायन, लेझिम डावासह मिरवणूकीत महाराष्ट्रतील नामवंत शाहीर मंडळांची पारनेरच्या बाजार पेठेतून भव्य मिरवणूकीच्या माध्यमातुन आपली शाहीरी लोककला पारनेर करांनी अनुभवली .सायं.७ वा. सद्गुरू पादुका पुजन झाले तर सायं. ७ ते १० वाजे पर्यंत महाप्रसादा साठी व दर्शनासाठी आमदार लंके सह विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी व भावीक भक्तांनी उपस्थिती दर्शविली .रात्री ८ ते सकाळ पर्यंत अध्यात्मिक भेदीक कलगीतुरा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे खास आकर्षन म्हणजे महाराष्ट्राचे लोककलावंत शहीर सम्राट , देवानंद माळी यांच्या सह महाराष्ट्रातील नामवंत भेदीक शाहीरांचा सवाल जवाबाचा कलगी तुऱ्याचा कार्यक्रमाने या धार्मिक कार्यात रंगत आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button