सिन्नर येथील शारदा महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी

सिन्नर प्रतिनिधी-
सिन्नर येथीलओम साई सामाजिक सेवाभावी संस्था संचलित शारदा महाविद्यालयामध्ये 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी प्रा.पवन वर्मा व प्रा.अंजुम सय्यद यांनी “भारत स्वच्छता अभियान” हुतात्मा स्मारक सिन्नर येथे राबविले. विद्यार्थ्यांनी यावेळी मोठया उस्फूर्तपणे सहभाग घेतला.
या कार्यक्रमास स्वामी विवेकानंद इन्स्टिटय़ूटचे उपप्राचार्य श्री.बार्गल सर उपस्थित होते,त्यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधी यांनी सांगितलेले आदर्श तत्वे,अहिंसा आणि सत्यता या त्रिसूत्री चा वापर करुन आपले विद्यालयीन व सामाजिक जीवन यशस्वी करावे,असे आव्हान केले.
कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉ. परशराम कांडेकर सर यांनी महात्मा गांधी यांचे जीवन व महान कार्य याबाबतची माहीत दिली व महात्मा गांधी यांची विचारसरणी अवलंबवावी असे त्यांनी सांगितले.

यावेळी महाविद्यालयातील प्रा.राजेंद्र पवार, प्रा.सविता कुरकुटे,प्रा.चैताली देशमुख, प्रा.गौरी मोरे ,प्रा.मयुरी व्यवहारे, प्रा.डॉ.निलोफर शेख, प्रा.अंजली कानडे, मोहिनी बोऱ्हाडे व नरहरी काळे आदींसह सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापिका अंजुम सय्यद यांनी केले.