अमृत कलश रथयात्रा चे राजुर मध्ये उत्सवात स्वागत

विलास तुपे
राजूर – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मेरी माटी, मेरा देश’ या अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेली ‘अमृत कलश’ रथ यात्रा सर्वांसाठी प्रेरणा देण्यासाठी रथयात्रेच्या आयोजन करण्यात आले होते
अकोले पंचायत समिती मार्फत आयोजित ‘अमृत कलश’ रथ यात्रेचे राजूर येथे जोरदार स्वागत करण्यात आले. या रथ यात्रेचे कलश पूजन माजी आ. वैभवराव पिचड तसेच सरपंच पुष्पाताई निगळे उपसरपंच संतोष बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच गणपतराव देशमुख, गोकुळ कानकाटे,रामा मुतडक ,अतुल पवार ,निलेश साकुरे , एड.दत्ता निगळे आधी सह सर्व राजूर ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.यावेळी सर्वोदय विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, जि.प मराठी शाळा, स्वामी समर्थ कन्या विद्यालय, व मधुकरराव पिचड माध्यमिक विद्यालय यांनी शिक्षकासह सहभाग नोंदवून लेझीम झांज पथक टिपऱ्या देशभक्तीपर वेशभूषा अशा विविध प्रकारे राजुर मध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली .

राजूर ग्रामपंचायत येथून विद्यार्थी – विद्यार्थिनींनी अमृत कलश रथ यात्रेची सवाद्य मिरवणूक काढत स्वागत केले. या अमृत कलश रथ यात्रेत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे लेझिम पथक सहभागी झाले होते. ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वरपे यांनी पदाधिकारी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना ‘मेरी माटी, मेरा देश’ शपथ दिली.राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांचे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते