देवीभोयरे येथे श्री अंबिका माता नवरात्रोत्सवाचे आयोजन

दत्ता ठुबे
पारनेर – पारनेर तालुक्यातील नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेली देवीभोयरे येथील श्री अंबिका माता नवरात्रोत्सव २०२४ ची तयारी सुरू असून या दरम्यान विविध कार्यक्रमांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल असल्याने भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा , असे आवाहन सरपंच अशोकराव मुळे , नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष अण्णा मुळे यांनी केले आहे .
गुरुवार दि . ३ रोजी सकाळी ८ वाजता घटस्थापनेच्या निमित्ताने तुळजापूर च्या श्री तुळजा भवानी मातेच्या मंदीर ते देवीभोयरे च्या श्री अंबिका मातेच्या मंदीरात ज्योत आणण्यात येणार असून सायंकाळी महाआरती व छबिना झाल्या नंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे . रात्री ८ . ३० वाजता खा . निलेश लंके यांच्या हस्ते व माजी सभापती सुदाम पवार यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे .
तदनंतर रात्री ९ . ३० वाजता आई माझी मायेचा सागर या विषयावर आवाजाचे जादूगार म्हणून संबोधले जाणारे प्रसिद्ध किर्तनकार हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे हृदयाला स्पर्श करणारे हरि किर्तन , तर दुसऱ्या माळेला शुक्रवार दि ४ रोजी रात्री ९ वाजता नारायणगांव येथील द रियुनियन डान्स ग्रुप चा कार्यक्रम , तिसरी माळ शनिवार दि . ५ रोजी रात्री ९ वाजता छत्रपती संभाजी नगर येथील शाहिर सुमित धुमाळ व संच यांचा जागर आदिमायेचा हा भक्तीमय कार्यक्रम, चौथी माळ रविवार दि . ६ रोजी रात्री ९ वाजता कैलास झगडे निर्मित रंग नवा . . ढंग नवा . . गीत , संगीत , नृत्याचा एक बहारदार कार्यक्रम असलेला ऑर्केस्ट्रा , पाचवी माळ सोमवार दि . ७ रोजी रात्री ९ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोककलावंत विलास अटक यांचा जागर कुलदैवतांचा बहारदार कार्यक्रम , सहावी माळ मंगळवार दि . ८ रोजी रात्री ९ वाजता भारूड सम्राट गोविंद महाराज गायकवाड यांचा भारूड कार्यक्रम , सातवी माळ बुधवार दि . ९ रोजी रात्री ९ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कोमलताई पाटोळे यांचा गीतांचा कार्यक्रम , आठवी माळ गुरुवार दि . १० रोजी रात्री ९ वाजता साई माऊली नाटय संस्था निर्मित , नवरे असेच असतात ! हे विनोद नाटक ,
नववी माळ शुक्रवार दि . ११ सकाळी ८ वाजता होमहवन , सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजता भव्य रक्तदान शिबीर , निलेश लंके प्रतिष्ठान संचलित फिरता दवाखाना मोफत नेत्र तपासणी सकाळी १० वाजता खिचडी महाप्रसाद , सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शाहीर रामदास गुंड विरुद्ध शाहीर तान्हाजी माळवदकर यांचा कलगी तुऱ्याचा जंगी सामना , रात्री ९ वाजता प्रसिद्धी कॉमेडी अभिनेता ॲड . ओम यादव यांच्या नियोजना खाली होम मिनिस्टर खेळ पैठणीचा , तर शनिवार दि . १२ रोजी विजयादशमी [ दसरा ] निमित्त दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत पालखी सोहळा मिरवणूक व रात्री ९ वाजता जल्लोष अप्सरांचा चा सदा बहार गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे कार्याध्यक्ष अक्षय बेलोटे , उपाध्यक्ष संदेश बेलोटे , माजी सरपंच विठ्ठल सरडे , शंकर सरडे , माजी उपसरपंच संपत वाळूंज यांनी सांगितले