सर्वोदय विदयालयात महात्मा गांधी जयंती साजरी.

अकोले प्रतिनिधी
सत्यनिकेतन परिवार हा गुरुवर्य रा.वि. पाटणकर,सावित्रिबाई मदन,बापु साहेब शेंडे यांच्या विचारधारेवर आधारीत असून सत्य आणि अहिंसा हाच खरा धर्म असून सत्य हा देव आणि अहिंसा त्या देवाची आराधना आहे.असे विचार प्राचार्य बादशहा ताजणे यांनी व्यक्त केले.
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्राचार्य श्री.ताजणे विचारमंच्यावरून बोलत होते.
याप्रसंगी संचालक विजय पवार, उपप्राचार्य दिपक बुऱ्हाडे,पर्यवेक्षक सदाशिव गिरी जेष्ठ शिक्षक रामभाऊ आढळ,धनंजय पगारे,किशोर देशमुख,नानासाहेब शिंदे,बीना सावंत,अधिक्षक मच्छिंद्र ढगे, यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्राचार्य बादशहा ताजणे यांनी पुढे मार्गदर्शन करताना महात्मा गांधीजींचे विचार आजही अनेकांच्या जीवनात आदर्श ठरतात.अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शास्त्र आहे.जगभरातील अनेक नागरी हक्क आणि स्वातंत्र्य चळवळींना महात्मा गांधीजींकडून प्रेरणा मिळाली.त्यांनी त्यांच्या विचारांनी आणि तत्वज्ञानाने लाखो लोकांचे मन जिंकले.गांधीजींच्या विचारांमध्ये अहिंसा, सत्य,सहिष्णूता आणि आत्मनिर्भरता यांसारख्या तत्वांचा समावेश आहे.या विचारांचा अभ्यास केल्यास आपल्या जीवनात आवश्यक असलेल्या मूल्यमापणाची तसेच सामाजिक न्यायाची जाणीव होईल.असे विचार व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन करून सर्वधर्मीय प्रार्थना घेण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक सदाशिव गिरी यांनी केले.सुत्रसंचलन श्रीकांत घाणे यांनी केले.तर विदयालयाने सत्यनिकेत विचारांची परंपरा पुढे चालू ठेवल्याने संचालक विजय पवार यांनी आभार मानले.