कानकाटे परिवाराच्या दातृत्वाने जामगाव, शाळेतील विद्यार्थी भारावले

विलास तुपे
राजूर/प्रतिनिधी.
मातोश्री उद्योग समूहाचे सर्वेसर्वा कै.अशोक भाऊ कानकाटे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त कानकाटे परिवाराच्यावतीने जि प प्राथमीक शाळा जामगाव येथील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी, एक सामाजिक बांधिलकी म्हणून ,शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कानकाटे परिवारातील सर्व सदस्य, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हसू पाहून भारावून गेले. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आपणही प्रयत्न केले पाहिजे ही सामाजिक बांधिलकी आपण जपली पाहिजे, त्यातून विद्यार्थी घडला पाहिजे ही अपेक्षा ऋषी कानकाटे यांनी व्यक्त केली,

आमच्या आजोबापासूनचा सामाजिक बांधिलकीचा वसा आम्ही भविष्यात सुद्धा निश्चितपणे जोपासू असा शब्द दिला ,त्याप्रसंगी जि प प्राथमीक शाळा केंद्रप्रमुख अडाने, नागरे मॅडम उपस्थित होत्या, त्यांनी सुद्धा अतिशय मोजक्या शब्दांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याचबरोबर उपसरपंच, गावातील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व ग्रामस्थ बंधू-भगिनी उपस्थित होते कानकाटे परिवाराचे प्रेम पाहून, त्यांचं दातृत्वाची भूमिका पाहून जि प प्राथमीक शाळा जामगाव येथील मुख्याध्यापक श्री सुपे सर त्याचबरोबर त्यांचे सहकारी शेळके सर यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला आणि त्यांना ग्वाही दिली की आम्ही निश्चितच आपण दिलेलं साहित्य, शैक्षणिक कामी मेहनतीने उपयोगी होईल आणि आम्ही त्याचा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चांगला उपयोग करून घेऊ असं मत व्यक्त केलं कानकाटे परिवारातील सर्व सदस्य तसेच केंद्रप्रमुख अडाणी मॅडम उपसरपंच शालेय व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य ग्रामस्थ यांचे वतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं,कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले