जी एस महानगर बँकेला शुन्य टक्के नेट एनपीए पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान

मुंबई :- शेडयुल्ड दर्जा असलेली व राज्यात सहकारी बँकींग क्षेत्रात अग्रगण्य असलेली जी एस महानगर बँकेने २०२३ व २४ या ५१ व्या आर्थिक वर्षात नेत्रदिपक कामगिरी करून नेट एनपीए शेकडा शुन्य टक्के ठेवण्यात यश मिळविल्या बद्दल पुणे जिल्हा नागरी बँक असोसिएशन च्या वतीने बँकेच्या अध्यक्षा सुमनताई शेळके यांना सन्मानपूर्वक पुरस्कार देवून गौरविण्यात आले .
जी एस महानगर बँकेला हा मानाचा पुरस्कार केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री ना . मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते आणि सहकार आयुक्त व राज्य सहकारी संस्थांचे निबंधक दिपक तावरे , रिझर्व्ह बँकेचे संचालक सतिश मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकेच्या अध्यक्षा श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके यांनी स्वीकारला , यावेळी बँकेच्या संचालिका स्मिता ताई शेळके , संचालक विकास उंद्रे , श्रीधर कोठावळे , केतन कोठावळे , कार्यलक्षी संचालक नितीन खोडदे व इतर मान्यवर उपस्थित होते .
सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षात बँकेचा निव्वळ नफा मागील सन २०२२ – २३ वर्षापेक्षा १३ कोटीने वाढून ३४ कोटी रुपये इतका झालेला असून बँकेच्या २ हजार ८८५ कोटी तर एकूण कर्जे १ हजार ५६४ असा एकूण ४ हजार ४४९ कोटी रुपये व्यवसायाचा टप्पा बँकेने पुर्ण केला असून सर्व स्तरावर बँक लक्षणीय कामगिरी करीत आहे . तसेच बँकेने आर्थिक दृष्टीने सक्षम बँकेचा दर्जा एफ एस डब्लू एम प्राप्त करून आपला लौकिक व विश्वासार्हता कायम टिकवून ठेवली आहे . बँकेचे सभासद , ठेवीदार , खातेदार यांच्या सहकार्याने बँकेने ही प्रगती केल्याची माहिती जी एस महानगर को – ऑपरेटीव्ह बँकेच्या अध्यक्षा श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके यांनी सांगितले .