सामाजिक

आदिवासी कोळी, ढोर,टोकरे , कोळी महादेव, डोंगर कोळी,कोळी मल्हार, या आदिवासींना कोळी नोंदीवरून जात व वैधता प्रमाणपत्र द्यावे

संजय महाजन

धुळे/नंदुरबार जिल्ह्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार व महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीतील क्रमांक २८,२९ व ३० वर असलेल्या आदिवासी कोळी, ढोर,टोकरे कोळी, कोळी महादेव, डोंगर कोळी,कोळी मल्हार, या आदिवासींना कोळी नोंदीवरून जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.

अनुसूचित जमातीच्या यादीत क्रमांक २८ वर कोळी, ढोर,टोकरे कोळी ही आदिवासी जमात नमूद आहे.२०११ च्या जनगणनेनुसार धुळे/नंदुरबार जिल्ह्यात या आदिवासींची संख्या ३,३३,६६२ मध्ये अंदाजे ४,८१००० पर्यंत झालेली आहे.अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक २९ वर कोळी महादेव ही आदिवासी जमात नमूद केली आहे.२०११ च्या जनगणनेनुसार धुळे/नंदुरबार जिल्ह्यात या आदिवासींची लोकसंख्या ३५,७२० आहे.२०२४

मध्ये अंदाजे ५०,००० झाली आहे.अनुसूचित जमातीच्या यादीतील क्रमांक 30 वर कोळी, मल्हार ही आदिवासी जमात नमूद आहे.धुळे नंदुरबार जिल्ह्यात २०११ जनगणनेनुसार या आदिवासींची लोकसंख्या २०.००० आहे.
२०२४ मध्ये ३०.००० झाली आहे.
आतापर्यंत फक्त ९ ते १० हजार जातीचे प्रमाणपत्र दिले गेले आहेत.वैधता प्रमाणपत्र बोटावर मोजण्या एवढेच दिले आहेत. त्यांना वस्ती,आडनाव, देवदेवता, नृत्य, डाग,व्यवसाय, चालीरीती,भाषा,सण,पेहराव, लग्न पद्धत,मृत्यू पद्धत इत्यादी कारणावरून जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र नाकारले जात आहे.भारतीय संस्कृती कोश खंड १ व ६ पान नं.४२९ व ५२९ नुसार कोळी एक आदिवासी जमात असून प्रोटोऑष्ट्रलाईड लोकांचे कोळी, भिल व शबर हे वंशज होते,असे मानववंशशास्त्रज्ञांचे मत आहे म्हणून त्यांना कोळी नोंदीवरूनच लवकरात लवकर सर्वांना जातीचे व वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे.आंदोलन प्रमुख आप्पासाहेब नामदेव येळवे,विधी कायदा सल्लागार, ॲड.गणेश सोनवणे,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष विजय मोरे,धुळे जिल्हा अध्यक्ष संजय दावळे, जळगाव जिल्हा अध्यक्ष सागर सोनवणे, कर्मचारी अध्यक्ष अरुण सूर्यवंशी,युवा अध्यक्ष प्रकाश चव्हाण, धुळे तालुका संपर्कप्रमुख दिलीप शिरसाठ, धुळे जिल्हा संपर्कप्रमुख साहेबराव वाकडे, धुळे तालुका अध्यक्ष संदीप तवर, निंबा शिरसाठ,भाईदास शिरसाठ, दगा चव्हाण,अशोक शिरसाठ, सचिन चव्हाण इत्यादींनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button