नेवासाफाटा येथे राजमाता जिजाऊ जंयती साजरी.

नेवासा प्रतिनिधी
12जानेवारी राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा जन्मदिन. आम्ही हा दिवस जिजाऊ जन्मोत्सव म्हणुन मोठ्या उत्साहात साजरा करतो. नेवासा फाटा येथे राजमुद्रा चौकात मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष मा. रावसाहेब घुमरे पाटील. यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला
. याप्रसंगी बोलताना मा. रावसाहेब घुमरे पाटील म्हणाले जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडविले. सुसंस्कारित व न्यायी केलेआणि त्यांच्या कार्य कर्तुत्वातुन आम्हाला स्वराजाची ओळख करुन दिली. छत्रपती शिवाजीराजे यांच्या रूपाने या देशात शिवशाही म्हणजे रयतेचे समतेचे व मानवतेचे राज्य निर्माण केले. आम्हाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या कर्तुत्वाला या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
यावेळी प्रमुख पाहुणे जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष अँड. सुरेखा टेमक. कार्य अध्यक्ष अँड. सोनल पाटील. संजुबाबा गायकवाड. पत्रकार बाळासाहेब देवखिळे. समाजिक कार्यकर्ते गणेशभाऊ झगरे. पि. आर. जाधव. अॅड. मयुर वाघ. महेश निपुंगे. माऊलीभाऊ देवकाते. मुकींदपुरचे पोलीस पाटील आदेशभाऊ साठे. अदि. शिवभक्त. कार्यकर्ते उपस्थित होते.