राज्यातील आय.टी. आय च्या अभ्यासक्रमातील बदलाच्या संदर्भात अकोल्यात कार्यशाळा संपन्न

अहमदनगर जिल्ह्यातील औ.प्र. संस्थांचे प्राचार्य व गट निदेशक यांची उपस्थिती
अकोले प्रतिनिधी-
कार्यशाळा आयोजनासाठी महाराष्ट्र ग्लास व अल्युमिनियम हाऊस चे उद्योजक भारत पिंगळे व यशराज सप्लायर्स चे उद्योजक जगन देशमुख यांनी आर्थिक मदत देऊन सहकार्य केले..टी .आय.च्या अभ्यासक्रमात झालेल्या बदलांचा अभ्यास करून त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे,विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीज चा प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा म्हणून ऑन द जॉब ट्रेनिंग साठी विविध कंपनीशी समन्वय साधावा असे प्रतिपादन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय नाशिक विभागाचे सहाय्यक संचालक एम के पाटील यांनी केले.
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी च्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोले यांच्या पुढाकाराने व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अहमदनगर यांच्या सहकार्याने आयोजित डिजिईटी नवी दिल्ली यांच्या परीपत्रकानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमात बदल केले असून त्याबाबत अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य,गटनिदेशक यांची कार्यशाळा संपन्न झाली .त्यामध्ये श्री पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते.
या कार्यशाळेच्या उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष इंजि.सुनील दातीर होते.या वेळी व्यासपीठावर नाशिक विभागाचे निरीक्षक ए एस देसाई, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस डी शिंदे,संस्थेचे खजिनदार धनंजय संत,कार्यकारिणी सदस्य शरदराव देशमुख, ऍड.आनंद राव नवले,प्राचार्य विद्याचंद्र सातपुते उपस्थित होते.
तसेच या कार्यशाळेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय व अशासकीय औ.प्र. संस्थाचे प्राचार्य व गट निदेशक, अकोले चे सर्व कर्मचारी असे एकूण 75 मान्यवर उपस्थित होते.
श्री पाटील पुढे म्हणाले की, राज्यात अशा प्रकारच्या कार्यशाळा ही नाशिक विभागात अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात प्रथम होत असून खाजगी आय.टी. आय.अकोलेने यासाठी पुढाकार घेतला,त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. अशा कार्यशाळा इतर जिल्ह्यात व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी अध्यक्षीय मनोगतात अध्यक्ष इंजि.सुनील दातीर म्हणाले की, ही कार्यशाळा आयोजित करण्याची संधी दिली.त्याबद्दल आभार व्यक्त केले.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन इंडिया,वन मिशन,स्किल इंडिया हे मिशन यशस्वी करण्यासाठी आय.टी. आय.ला पुढाकार घ्यावा लागणार आहे.20 व्या शतकात आय आय टी ला महत्व होते आता 21 व्या शतकात आय टी आय ला महत्व आलेले आहे.देशातील बेरोजगारी कमी करायची असेल तर युवकांच्या हाताला कौशल्य द्यावे लागेल.आणि हे काम आय टी आय च्या माध्यमातून करणे ही तुमची आणि आमची जबाबदारी आहे.बदलत्या काळानुसार, गरजेनुसार व नवीन तंत्रज्ञान विकसित होतांना अभ्यासक्रम बदलणे गरजेचे होते.तसा बदल झालेला आहे.त्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करावे. स्कीलिंग,री- स्कीलिंग आणि अप स्कीलिंग या धोरणाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना तयार करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी कार्यकारीणी सदस्य शरदराव देशमुख म्हणाले की, आजच्या तंत्र विज्ञान व संगणक युगात आय टी आय च्या विद्यार्थ्यांना फार महत्व आले आहे.त्यांना अधिक कौशल्यपूर्ण करण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करावे लागणार आहेत.
या उदघाटन समारंभानंतर कार्यशाळा सुरू करण्यात आली.हा मध्ये सहाय्यक संचालक एम के पाटील यांनी बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन केले.त्यामध्ये थिअरी विषयाचा काही भाग वगळण्यात आलेला आहे,प्रॅक्टिकल वर भर देण्यात आला असून ऑन द जॉब ट्रेनिंग आणि शॉर्ट टर्म कोर्सेस यांचा सहभाग झालेला आहे.याचा विचार करून वेळापत्रक बनवावे.
निरीक्षक ए एस देसाई यांनी बदललेल्या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक कसे बनवायचे याबाबत मार्गदर्शन केले. आताअभ्यासक्रम हा 1200 तास थिअरी,प्रॅक्टिकल अधिक 150 तास न द जॉब ट्रेनिंग वेळअधिक 240 तास हे शॉर्ट टर्म कोर्सेस साठी अशी विभागणी केले आहे त्याचे व्यवस्थित वेळापत्रक बनवावे असे सांगून
इंजिनिअरिंग ड्रॉईंग व गणित व विज्ञान विषय हे थिअरी मध्ये समाविष्ट झालेले असून त्यासाठी असलेल्या निदेशकांच्या कामांचे नियोजन करावे अशी सूचना केली.
तर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस डी शिंदे यांनी ऑन द जॉब ट्रेनिंग या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी . कंपनीशी सम्पर्क साधून त्यांना ऑन द जॉब ट्रेनिंग साठी सहकार्य करण्याचे आवाहन करावे.असे सुचविले. तसेच ज्या भागातील आय.टी. आय.ना जवळ इंडस्ट्रीज नाही त्या संस्थानी ग्रुप प्रोजेक्ट उपक्रम राबवावा असे सांगून त्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी विभागामध्ये उत्कृष्ट औ.प्र. संस्था म्हणून पुरस्कार मिळाल्या बद्दल लोकपंचायत आय टी आय च्या प्राचार्य श्री. सहाणे व गट निदेशक श्री .हासे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच महिला प्रतिनिधी यांच्या उपस्थितीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यशाळेसाठी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल व सुंदर नियोजन केल्याबद्दल प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, गट निदेशक मच्छिंद्र गायकर, सर्व निदेशक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांचा सत्कार सहाय्यक संचालक एम के पाटील व अधिकारी यांनी केला.
ही कार्यशाळा दोन सत्रात संपन्न झाली.पहिल्या सत्रात उदघाटन व कार्यशाळा मार्गदर्शन त्यानंतर स्नेह भोजन व नंतरच्या सत्रात मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे व चर्चा करण्यात आली.
यावेळी सहभागी झालेल्या प्राचार्य यांचे वतीने प्रातिनिधिक स्वरूपात प्राचार्य आर एस खोजे व व्ही व्ही भाटे यांनी कार्यशाळेविषयी मनोगत व्यक्त केले.
स्वागत प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस डी शिंदे यांनी केले.सुत्र संचालन आर के आरोटे यांनी केले.आभार प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी मानले.
कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, गट निदेशक मच्छिंद्र गायकर, आर .के. आरोटे,एस .एन. हासे,बी .डी .धुमाळ,पी बी नवले, एस .यु .देशमुख, एन .जी. थटार,बी जे. वैद्य,ए. डी .घुले,एस .एस .मंडलिक, एस पी. वैद्य,बी. एम. धुमाळ,डी. व्ही.धुमाळ,यांचेसह विद्यार्थी तिलक मेंगाळ,राहुल गडाख,हर्षल गजे,हर्षल शिंदे ,शुभम आरोटे व प्रांजल कुमकर यांनी विशेष परिश्रम घेतले.