जीवन ज्योत फाऊंडेशन मुुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यां ची दिवाळी गोड

नेवासा प्रतिनिधी
नेवासा तालुक्यात मागील वर्षी 2023 भरलेला पिकविमा शेतकर्यांचे खात्यात वर वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे.जीवन ज्योत फाऊंडेशन च्या प्रयत्नांना यश आले आहे.मागील वर्षीय पिकविमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहे.तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
नेवासा तालुक्यातील नुकसानग्रस्त मंडळातील शेतकऱ्यांना पिकविमा मंजूर होऊन परंतु कंपनी व कृषी,तहसील कार्यालय च्या अधिकार्यांच्या हलगर्जीपणा मुळे शेतकर्यांना मागील वर्षीचा पिकविमा मिळाला नाही.तसेच त्यानंतरही ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या त्यांनाच विमा रक्कम मिळणार असा सुर निघू लागला होता. परंतु मोबाईलला रेंज नाही व शेतावर 24 तास लाईट नसल्या कारणाने सर्व शेतकरी ऑनलाइन तक्रारी देऊ शकत नाही व त्यामुळे लाभापासून वंचित राहतात ही बाब प्रशासनासमोर निदर्शनास आणून दिली.त्यामुळे 12 ऑगस्ट 2023 ते 6 सप्टेंबर 2023 हा कालखंड अवर्षण काल आहे व तो 21 दिवसांपेक्षा जास्त आहे हे शासनाच्या लक्षात आणून दिले.आणि पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत असलेल्या नियमावलीत 21 दिवसापेक्षा जास्त कालखंड अवर्षण असल्याने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना शासकीय उंबरठ उत्पन्न ग्राह्य धरून सरसकट विमा रक्कम द्यावी यासाठी जीवन ज्योत फाऊंडेशन ने मागणी केली होती.शेतकऱ्यांना पिकविमा मिळण्यासाठी जीवन ज्योत फाऊंडेशनांच्या मार्गदर्शनाखाली व कमलेश नवले पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषी कार्यालयाचा व कृषी मंत्री यांचा दशक्रिया विधी आंदोलन करण्याचा ईशारा दिला परंतु यांची कुठल्याही दखल घेतली गेली नाही म्हणून पिकविमा कंपनी ची नवी दिल्ली पंतप्रधान कार्यालय येथे तक्रार दाखल करण्यात आली.या नंतर ही जीवन ज्योत फाऊंडेशन ने मुख्यमंत्री,कृषी मंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून शेतकऱ्यांना पिकविमा मिळण्यासाठी प्रयत्न केले.या वेळी विशेष सहकार्य प्रदेश अध्यक्ष नरेंद्र नवथर (सर),तालुका कार्यअध्यक्ष आप्पासाहेब आरगडे,खजिनदार अक्षय बोधक,तालुका अध्यक्ष राहुल कांगुणे,जिल्हा कार्यअध्यक्ष विजय खरात,तालुका युवक अध्यक्ष प्रतिक आरगडे,सत्यमेव जयते प्रतिष्ठान चे जैद शेख,अभिजीत बोधक,प्रकाश मुळक,तौफिक शेख,अक्षय आरगडे,प्रदीप आरगडे,चंद्रकांत आरगडे,मनोज आरगडे,योगेश आरगडे,बाळासाहेब चामुटे,संभाजी आरगडे सर्व सहकारी मिञ परिवार,कायदेशीर सल्लागार व शेतकरी बांधव यांचे नवले यांनी आभार मानले.अखेर आज मागील वर्षीचा पिकविमा तालुक्यातील शेतकर्यांच्या खात्यात वर जमा झाली असून या मुळे जीवन ज्योत फाऊंडेशन च्या पाठपुरावात यश आले असून तालुक्यातील स्थानिक नागरिकांकडून जीवन ज्योत फाऊंडेशन चे अभिनंदन होत आहे.