वात्सल्य वृद्धा श्रमात एक अनोखा जन्मदिवस साजरा

नाशिक प्रतिनिधी /डॉ. शाम जाधव
नाशिक आज दिनांक१२/१०/२०२४ रोजी वात्सल्य वृद्धाश्रम अनोखा वाढदिवस साजरा आयुष्यमान अर्जुन शंकर कुटे व आयुष्य माननीय मीराताई अर्जुन कुटे यांच्या कन्या कुमारी विजया अर्जुन कुटे यांचा अनोखा जन्मदिवस साजरा केला
वात्सल्य वृद्ध आश्रम आजी बाबांच्या सानिध्यात साजरा करण्यात आला वात्सल्य वृद्धाश्रम चे संस्थापक अध्यक्ष सतीश सोनार सर वृद्ध आश्रमातील कर्मचारी तसेच श्री राधिका बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सौ चेतनाताई सेवक विकी कुटे आई-वडिलांच्या सोबत हा एक अनोखा वाढदिवस साजरा करताना आनंद वाटतो की माझी मुलगी कुमारी विजया अर्जुन कुटे एम फार्म असिस्टंट प्रोपेसर ब्रह्मा व्हॅली कॉलेज फार्मसी त्रंबकेश्वर नाशिक शून्यातून विश्व निर्माण करणारे अर्जुन दादा व मीराताई यांनी आपल्या मुलाचे उच्च शिक्षण व्हावे यासाठी मोठ्या कठोर परिश्रम घेतले ह्या वाढदिवसानिमित्ताने त्यांची एक संकल्पना होती की माझ्या मुलीचा जन्म दिवस हा वृद्धाश्रम यामध्येच मी साजरा करेल असा त्यांचा मानस होता आणि तो त्यांनी पूर्ण केला संपूर्ण समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करणारी माय बाप हे अनोखे नाव अथांग सागराप्रमाणे असे स्थिरपणे राहील आपल्या परिवाराची प्रगती हीच त्यांच्या आनंदाचे सामर्थ्य होय