सोलापुरात आकाश कंदील बनवण्याचे मोफत प्रशिक्षण..

पद्मशाली सखी संघम चा उपक्रम
सोलापूर – नवरात्र महोत्सव व दस-यानंतर सर्वांनाच दिवाळीचे वेध लागतात. सर्व सामान्य कुटूंबे दिवाळीत घरावर आकाश कंदील लावल्याशिवाय त्यांना ‘दिवाळी साजरा’ केल्यासारखे वाटत नाही, म्हणून, आकाश कंदील आवर्जून लावतात. आजच्या महागाईच्या जमान्यात सामान्य कुटूंबियांना खरेदी करणे शक्य होत नाही म्हणून सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीने नि:शुल्क, (मोफत) प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी दिले आहे.
पूर्व भागातील दत्तनगर चौकातील दाजी गणपती येथे शनिवार, दि. १९ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ऑल इज वेल बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक सुरेश येमूल हे प्रशिक्षण देणार आहेत.

आकाश कंदील शिकण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच साहित्य आणाव्यात. आकाश कंदील बनवण्यासाठी साहित्य पुढीलप्रमाणे – फेविकॉल, स्टेपलर, कात्री, रंगीत घोटी कागद, दोरा, जाड कार्डशिट व इतर. प्रशिक्षण कार्यक्रमात प्रत्येक व्यक्ती येउन आवडीने शिकावे, यासाठी किमान ३ – ४ प्रकारच्या आकाश कंदील तयार करण्याचे सोप्या पध्दतीने शिकवले जातील. या प्रशिक्षण कार्यक्रमात शाळा – महाविद्यालयाचे विद्यार्थी, सर्व सामान्य नागरिक, महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन, उपाध्यक्ष – मंजुळा आडम – कल्याणी पेनगोंडा, सहसचिव – लक्ष्मी कोडम, खजिनदार – आरती बुधाराम, सहखजिनदार – विद्या सिंगम, कार्याध्यक्षा – अन्नपूर्णा सोमा, सहकार्याध्यक्षा – आरती आडम, समन्वयिका – गीता भूदत्त – कला चन्नापट्टण, मार्गदर्शिका – प्रा. सपना मिठ्ठापल्ली, सल्लागार – ममता मुदगुंडी – सीमा यलगुलवार. कार्यकारिणी सदस्या – वनिता सुरम, ॲड. मेघना मलपेद्दी, भाग्यश्री मडूर, हेमा मैलारी, पद्मा मेडपल्ली, पल्लवी संगा, सुनिता दारा, सविता अंबाल, मीना कंदीकटला, अनिता कोंका, सुजाता इंदापूरे, विद्या श्रीगादी, सोनाली तुम्मा, सुनिता निलम (क्यामा), विद्या मुशन, दिव्यांजली आरकाल, श्वेता वल्लाल, ज्योती दासरी, राजेश्वरी बल्ला, नम्रता दुडम, अनुराधा बुरा, नेहा दासरी, ललिता चिंतमपल्ली, लता दुधगुंडी, पल्लवी सादूल, कल्पना दिकोंडा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी +919370454549 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावेत.