शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला भाजपचे कट कारस्थान!
आमदार डॉ. किरण लहामटे

अकोले प्रतिनिधी
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार यांच्या घरावर केलेला हल्ला हा पूर्व नियोजित भाजपचा कट होता या हल्ल्याचा निषेध करत अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने हा हल्ला भाजपचा असून पूर्वनियोजित कट होता असा आरोप आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केला
अकोले येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हार घालून या आंदोलनाची सुरवात केली शरद पवार यांच्य यांच्या समर्थनार्थ घोषणा देते या हल्ल्याचा निषेध नोंदवला ,आंदोलनासाठी आमदार डॉ किरण लहामटे ,अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व अगस्तीचे व्हाईस चेअरमन सीताराम पाटील गायकर, तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे ,श्री शेटे, सुरेश गडाख महिला तालुकाध्यक्ष स्वाती शेणकर युवक अध्यक्ष रवी मालुंजकर सुरेश खांडगे, संपतराव नाईकवाडी प्रमोद मंडलिक, रामनाथ शिंदे मचिंद्र धुमाळ आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार लहामटे यावेळी म्हणाले की शरद पवार हे देशाचे लाडके नेतृत्व आहे त्यांनी कृषिमंत्री असताना चांगले निर्णय घेतले महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक क्रांती मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर महाराष्ट्र मध्ये चांगले विचारांचे राजकारण केले
आदरणीय शरद पवार यांच्या विचारांचे महाराष्ट्रात आघाडी सरकार काम करत असताना एसटी कामगारांचा संप यशस्वीरीत्या मिटवला परंतु सदावर्ते नावाच्या वकिलाने एसटी कामगारांची माथी भडकावून कामगारांना भडकावले यामध्ये भाजपचा हात असल्याचा असून यामागे पूर्वनियोजित कट असल्याचे आमदार लहामटे म्हणाले भाजपने सुपारी घेऊन हे काम केल्याचे ते म्हणाले भाजपचे हे कटकारस्थान महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करणार नाही या घटनेचा जाहीर निषेध करून यामागील कटकारस्थान करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आज पर्यंत कार्यकर्त्यांनी संयमाची भूमिका ठेवली यापुढे जशास तसे त्याला उत्तर दिले जाईल असे आमदार लहामटे यांनी सांगितले

————