मजूर संस्थांना कामांची मर्यादा 25 लाखा पर्यंत करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी -अर्जुनराव बोरुडे

अहमदनगर प्रतिनिधी
मधल्या काळात मजूर संस्थांचा काळ अडचणीचा होता त्यावेळी आपण पाठपुरावा केला कामांची मर्यादा दहा लाखाची केल्याने संस्थांचे पुनर्जीवन झाले आहे यापुढे आता मजूर संस्थांना 25 लाखांपर्यंत विना निविदा कामे मिळावेत यासाठी शासन दरबारी प्रस्ताव सादर केला आहे शासन स्तरावर यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे अहमदनगर जिल्हा मजूर संस्था फेडरेशनचे अध्यक्ष अर्जुनराव बोरुडे यांनी सांगितले
अहमदनगर जिल्हा मजूर सहकारी संस्था मर्यादित अहमदनगर च्या संचालक मंडळाच्या पंच वार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने अहमदनगर क्लब अहमदनगर येथे आयोजित मेळाव्यात ते अध्यक्षपदावरून ते बोलत होते
यावेळी फेडरेशनचे व्हा.चेअरमन विकीशेठ जगताप संचालक अनिल मामा पाचपुते,संचालक उत्तमराव घोगरे पाटील संचालक सौ सुनिता जयंतराव वाघ,संचालक नामदेव ढोकणे,संचालक विजय गायकवाड, संचालक राजू फकीर, संचालक सुरेश बानकर, संचालक बाबुराव पवार,संचालक, सौ संगिता झुंबर पवार संचालक, मनोज कुलकर्णी संचालक,किशोर गायकवाड, बन्सी कराळे, शंकरराव गायकवाड , जामखेड चे उमेदवार पांडुरंग उबाळे पारनेर चे उमेदवार बी एल ठुबे, संगमनेरचे उमेदवार नानासाहेब कानवडे,लाळगे काका आदी मान्यवर व जिल्ह्यातील मजूर संस्थांचे मतदार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते
मजूर फेडरेशनच्या कामकाजाची माहिती देत चेअरमन अर्जुन अर्जुन राव बोरुडे यांनी सभासदांच्या सूचना विचारात घेऊन सर्वसामान्य सभासदांना न्याय देण्याचे काम करू या पुढील काळात सभासदांना निश्चित न्याय देण्याचे काम करू

पूर्वी प्रमाने सभासदांच्या विमा पॉलिसी संरक्षण देण्याचा प्रयत्न राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले

बोरुडे म्हणाले की जिल्हा मजूर फेडरेशन ची आर्थिक स्थिती राज्यातील इतर फेडरेशन पेक्षा भक्कम व उत्तम आहे सध्या दहा लाखाची कामांची मर्यादा शासनाने दिल्याने मजूर संस्था चळवळीचे पुनर्जीवन झाले आहे या पुढील काळात मजूर संस्थांना जास्तीत जास्त कामे कशी मिळतील त्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार असल्याचे विद्यमान चेअरमनअर्जुनराव बोरुडे यांनी सांगितले सहकार पॅनल च्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिकक्याने निवडून आणावे असे आवाहन त्यांनी केले
.या प्रसंगी उमेदवार बी.एल ठुबे, बन्शीभाऊ कराळे,जयंतराव वाघ, संचालक उत्तमराव घोगरे पाटील ,सुभाष राख,मनोज कुलकर्णी आदींनी आपले मनोगत व्यक्त करून सहकर मंडळाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले ,शेवटी राहुरीचे ढोकणे इंजिनिअर यांनी उपस्थिरांचे आभार मानले.यावेळी जिल्ह्यातील मजूर संस्थांचे प्रतिनिधी मतदार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते
.