युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेच्या राष्ट्रिय उपाध्यक्षपदी राजेंद्र करंदीकर.

दत्ता ठुबे
पारनेर दि.१४ पारनेर प्रतिनिधी
अशोका विजया दशमीच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने श्रीगोंदे येथे युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
पारनेर तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर चळवळीचे पूर्ण वेळ समाज परीवर्तन चळवळीचे कार्य करणारे युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेचे सिनियर केडर राजेंद्र करंदीकर यांची संघटनेच्या राष्ट्रिय उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती राष्ट्रिय अध्यक्ष कमलकांत काळे यांनी जाहिर केले. त्यांच्या नियुक्तीचे राज्य संयोजक प्रा अजित खरसडे,पारनेर पश्चिम विभाग सेवा सहकारी सोसायटीचे व्यवस्थापक सचिव सुरेश रोकडे, संचालक शरद नगरे, जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब पातारे,आर पी आय (आंबेडकर गट) अध्यक्ष किरण सोनवणे, सुरेश गायकवाड, संतोष अडसूळ, संतोष विधाटे, नितीन पाडळे, बापु बोराटे, रमेश कुसाळकर, नामदेव राळेभात, विजय गायकवाड, सचिन झगडे, विठ्ठल शिंदे, विठ्ठ्ल साळवे, डॉ. दत्तात्रय जगताप, डॉ. प्रशांत साळवे, डॉ. दत्तात्रय भरणे, आश्विन कांबळे, राजेंद्र बचाटे आदींनी अभिनंदन केले आहे.