चांगल्या कारभारा साठी शेतकरी विकास मंडळाला आशीर्वाद द्या – वैभवराव पिचड

अगस्ती कडेलोटाकडे नेऱ्यांचे या निवडणुकीत विसर्जन करा
– बी जे देशमुख
कोतुळ प्रतिनिधी
अगस्ती ला चांगला कारभार देण्यासाठी शेतकरी विकास मंडळाला आशीर्वाद द्या असे आवाहन माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले
अगस्ती कारखाना निवडणुकी बाबत कोतुळ येथे आयोजित संवाद बैठकीत ते बोलत होते अध्यक्षस्थानी अगस्ती कारखान्याचे माजी संचालक सयाजीराव देशमुख हे होते
अगस्ती कारखान्याला जिल्हा बँकेकडून मिळालेल्या 87 कोटी च्या कर्जा चे श्रेय कोणी घेऊ नये त्यासाठी ,अगस्तीच्या सर्व संचालकांनी स्वताचे बॉंड व हमीपत्र दिले आहे यामुळे मिळालेल्या कर्जाचे श्रेय कोणी घेऊन स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये असा टोला माजी आमदार वैभवराव पिचड यांनी लगावला ते पुढे म्हणाले की विद्यमान आमदारांनी अडीच वर्षात साधा वनराई बंधारा बांधला नाही, कुठे पाणी कुठे अडवले नाही उलट आढळा मुळा तील जे आहे ते पाणी खाली पळविण्याचे काम केले
आमदार झोपेच सोंग घेत आहेत त्यांना उठवता येणार नाही अडीच वर्षात तालुक्यात खेळ खंडोबा झाला एक महिन्यात रस्त्यांचे वाटोळे झाले आता बोध घेण्याची वेळ आली आहे असे माजी आमदार वैभवराव पिचड यावेळी बोलताना म्हणाले

अगस्ती कारखाना कडेलोटाकडे नेऱ्यांचे या निवडणुकीत विसर्जन करा असे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी श्री बी. जे. देशमुख यांनी सांगितले
आमदार डॉ किरण लहामटें यांच्या कार्यपद्धतीवर तसेच शेतकरी नेते कॉ डॉ. अजित नवले , राष्ट्रवादी चे अशोकराव भांगरे ,काँग्रेसचे नेते मधुकरराव नवले यांच्यावर बी जे देशमुख यांनी सडकून टीका केली

पिचड यांनी अगस्तीची उभरणीं केली त्यांना या वयात दुःख दयायचे नाही म्हणून सर्वांनी शेतकरी मंडळाच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम पाटील देशमुख यांनी केले
यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे
जेष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब रकटे, प्रकाश नवले
ऍड सदानंद पोखरकर ,रेश्मा गोडसे, संपतराव पवार, प्रा सहदेव चौधरी ,सागर देशमुख,बाबुराव देशमुख, सुभाष घुले संजय लोखंडे आदींनी मनोगत व्यक्त केले
मला मतदान करू नका !
अगस्ती कारखान्यात अपक्ष उमेदवार असणारे सुभाष घुले म्हणाले की मला उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास वेळ मिळाला नाही माझा अर्ज मला मागे घेता आला नाही जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्याशी मी एकनिष्ठ आहे पिचड हेच कारखाना चालविण्यास सक्षम आहे म्हणून मी शेतकरी विकास मंडळाला जाहीर पाठींबा दिला आहे सभासदांनी मला मतदान करू नये छत्री हे चिन्ह घेऊन उभे असणारे शेतकरी विकास मंडळाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे यावेळी श्री सुभाष घुले यांनी सांगितले
- रानबोका गेला ! आणि सरकार गेलं
- वैभव पिचड यांना पुन्हा आमदार म्हणून पाहीन आणि मगच मी वर जाईल असे ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब रकटे यांनी म्हटले मी मधुकरराव पिचड यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे समोरच्या मंडळात अलीबाबा ची टोळी आहे पिचड सायबानी पोसलेला एक बोका या टोळीत गेला आणि त्यांचे राज्यात सरकार गेले असा उपरोधिक टोला श्री भाऊसाहेब रकटे यांनी यावेळी मारला
यावेळी बैठकीस शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष गिरजाजी जाधव, कोतुळ चे सरपंच भास्कर लोहकरे , अकोल्याचेउपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, सयाजीराव देशमुख , रावजी धराडे, गणेश पोखरकर, लहीतचे सरपंच अर्जुन गावडे अकोले बाजार समितीचे उपसभापती भरत देशमाने, भीमराज देशमुख, माजी जि प सदस्य रमेश शेंगाळ , भानुदास देशमुख भाऊसाहेब नाईकवाडी ,संदीप शेटे, भाऊसाहेब देशमुख राजेंद्र पाटील देशमुख बाळासाहेब सावंत ,रावसाहेब शेळके आदी सर्व उमेदवार व परिसरतील शेतकरी यावेळी उपस्थित होते
