
व्हाईस चेअरमन पदी नितीन देशमुख
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील सुगाव बु येथील अगस्ती अमृत सहकारी दूध संस्था सुगाव बु च्या चेअरमन पदी माणिकराव रामराव देशमुख तर व्हा. चेअरमन पदी नितीन गोविंद देशमुख यांची निवड करण्यात आली.
अगस्ती अमृत सहकारी दूध संस्थेची निवडणूक अगस्ती साखर कारखान्याचे माजी संचालक माणिकराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बिनविरोध झाली. पदाधिकारी निवड बैठक अप्पर लेखापरीक्षक सहकारी संस्था पाथर्डी चे एस जी मरकड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी नूतन संचालक नितेश तान्हाजी देशमुख, राजेंद्र बाबूलाल देशमुख, सचिन बाळासाहेब देशमुख, संतोष रमेश देशमुख, शांताराम दिनकरराव देशमुख, सविता सतीश भांगरे, सिंधुबाई सर्जेराव देशमुख, बाळासाहेब चहादू साबळे, जगदीश मनोहर उगले आदी उपस्थित होते.
नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाचे माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार अमृतसागर दूध संघाचे चेअरमन वैभवराव पिचड यांनी अभिनंदन केले.