भंडारदरा संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार

जिल्ह्यात ५०० पोलीस कर्मचाऱ्यांचा तुटवडा
अकोले.प्रतिनिधी
पर्यटन पंढरी असणाऱ्या भंडारदरा धरणाच्या संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार असून त्याबाबत कोणताही हलगर्जीपणा होणार नाही असे सांगत जिल्ह्यात पोलीसांचा तुटवडा लक्षात घेवून अधिक चे ५०० पोलीस कर्मचारी मिळावेत या साठी राज्य सरकारकडे ५०० पोलिस कर्मचारी मिळावेत यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
राजूर पोलिस स्टेशनचे वार्षीक तपासणी साठी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील राजूर येथे आले होते.
यावेळी अकोले तालुका पत्रकार संघाने जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे यांचा यावेळी सत्कार केला याप्रसंगी पत्रकारांनी भंडारदरा धरणाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला असता ते बोलत होते .सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी राजूर पोलिस स्टेशनचा अहवाल सादर केला. भंडारदरा जलाशयावर जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांचे लक्षअसून यापुढे कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्या चे त्यांनी सांगितले .हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर यांचेवर दंडात्मक कारवाई केली जाईल.तर केंद्र व राज्य तपासणी विभागाने काही त्रुटी राहिल्या आहेत याबाबत अहवाल दिला आहे.त्याची पूर्तता करण्यात येईल .असे त्यांनी सांगितले.

राजूर पोलिस स्टेशन बाबत अनेक गैरसमज होते मात्र मागील पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील व विद्यमान सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी पोलिस स्टेशनची प्रतिमा सुधारली आहे.त्यामुळेच राजूर पोलिस स्टेशन राज्यात पाचव्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त करून आपले कर्तृत्व सिद्ध करू शकले याचा पोलीस डिपार्टमेंट ला अभिमान असल्याचे सांगत त्यांनी.यावेळी त्यांनी राजूर पोलिसांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी यावेळी मनोज पाटील यांचे स्वागत केले