आजचे पंचांग व राशिभविष्य दि.१८/१०/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन २६ शके १९४६
दिनांक :- १८/१०/२०२४,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०३,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति १३:१६,
नक्षत्र :- अश्विनी समाप्ति १३:२६,
योग :- वज्र समाप्ति २१:३४,
करण :- तैतिल समाप्ति २३:३०,
चंद्र राशि :- मेष,
रविराशि – नक्षत्र :- तुला – चित्रा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी १०:४७ ते १२:१४ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:५२ ते ०९:२० पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२० ते १०:४७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:१४ ते ०१:४१ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
इष्टि, प्रतिपदा – द्वितीया श्राद्ध,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आश्विन २६ शके १९४६
दिनांक = १८/१०/२०२४
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
मोठा प्रवास करता येईल. अचानक घडामोडी घडतील. कामाचे व्यवस्थापन करण्यात दिवस निघून जाईल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. नवीन काम सुरू करण्यापूर्वी सर्व बाबी तपासून घ्या.
वृषभ
मनाची चंचलता जाणवेल. मुलांकडून आनंद मिळेल. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. हितशत्रू पराभूत होतील. हाताखालील कामगारांचे चांगले सहकार्य मिळेल.
मिथुन
कामात काही बदल घडून येतील. जोडीदाराच्या सल्ल्याची मदत घ्याल. धावपळ करावी लागेल. दिवस संमिश्रतेत जाईल. मित्रांशी झालेला संवाद मन प्रसन्न करून जाईल.
कर्क
लहान प्रवास घडेल. घरगुती कामात व्यस्त राहाल. घरातील टापटिपीकडे अधिक लक्ष द्याल. नातेवाईकांच्या भेटीचे योग आहेत. व्यावसायिकांनी अधिक परिश्रम घ्यावेत.
सिंह
अडकलेल्या कामांना जोर लावावा. नशीबाची साथ मिळेल. व्यापारी वर्गाला सहकार्याकडून मदत मिळेल. बोलण्यातील गोडवा कायम ठेवा. हस्तकलेसाठी वेगळा वेळ राखून ठेवा.
कन्या
घरातील गोष्टी मनाप्रमाणे घडतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. कामाची विचारपूर्वक अंमल बजावणी कराल. हातात काही अधिकार येतील.
तूळ
क्षुल्लक कारणांवरून चीडू नका. गोड बोलून कार्यभाग साधावा. तुमच्या व्यक्तिमत्वाची चांगली छाप पडेल. आनंदाची अनुभूती घ्याल. मिळकतीची नवीन स्त्रोत सापडतील.
वृश्चिक
नियोजन बद्ध कामे करा. मुलांची स्वतंत्र मते जाणून घ्या. क्रोध वृत्तीला आवर घाला. कामकाज सुधारण्याकडे अधिक लक्ष द्या. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते.
धनू
नातेवाईकांना मदत कराल. घरगुती खर्च आटोक्यात ठेवा. स्वत:च्या हिंमतीवर कामे हाती घ्याल. तरुण लोकांशी मैत्री होईल. कामात स्त्रियांची मदत लाभेल.
मकर
महत्त्वाचे निर्णय हाती लागू शकतात. दिनक्रम व्यस्त राहील. आर्थिक व्यवहारात दक्ष राहावे. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका.
कुंभ
मनाविरुद्ध गोष्टी करू नका. संभ्रमीत अवस्थेत निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवन सुखमय असेल. जवळचा प्रवास चांगला होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना मान मिळेल.
मीन
विचार सतत बदलू नका. तडकाफडकी गोष्टी करू नका. कुटुंबासमवेत वेळ घालवा. डोकेदुखीचा त्रास संभवतो. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर