भायगाव येथील नवनाथ बाबा देवस्थानच्या दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान

शहराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव नेवासा राजमार्गावरील
श्री.क्षेत्र भायगाव येथील भायगावचे ग्राम दैवत श्री नवनाथ बाबा देवस्थानची पायी दिडिंचे आषाढी वारी करिता श्री क्षेत्र भायगाव ते श्रीक्षेत्र पंढरपुर या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान झाले. श्री.क्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने गहिनीनाथ महाराज आढाव, हारीभाऊ महाराज अकोलकर, विष्णु महाराज दुकळे व नवनाथ बाबा भजनी मंडळ भायगाव यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.या दिंडी सोहळ्याचे हे २० वे वर्ष आहे. परिसरात अतिशय शिस्तप्रिय दिंडी म्हणून परिसरात ओळखली जाते. दिनांक १५/०६/२०२३ ते २९/०६/२०२३ पर्यत हा प्रवास असणार आहे. त्यानंतर सोमवार दिनांक ०३/०६/२०२३ रोजी भायगाव येथे श्री नवनाथ बाबा देवस्थानच्या सभागृहात भायगाव येथे गहिनीनाथ महाराज आढाव यांच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता होईल. त्यानंतर रामनाथ झेंडे व विजय दुकळे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. प्रस्थान वेळी अविनाश महाराज लोखंडे, महेश महाराज शेळके, प्रतिभाताई महाराज शेळके,भाऊसाहेब महाराज शेकडे, भायगावच्या सरपंच मनिषा आढाव, युवा नेते राजेंद्र आढाव, माजी चेअरमन जनार्दन लांडे, सदाशिव शेकडे, गणपत आढाव, हरिचंद्र आढाव,हरिचंद्र घाडगे प्रगतशिल शेतकरी शेषेराव दुकळे, हरिचंद्र चव्हाण. डॉ. विजय खेडकर, विठ्ठल प्रल्हाद आढाव,शिवाजी लांडे, भागचंद धावणे, बाळासाहेब दुकळे, बापुराव दुकळे,माणिक शेकडे,पंढरीनाथ लांडे,नानासाहेब दुकळे, बबनराव सौदागर, माऊली सौदागर, सुदाम खंडागळे,संदीप लांडे,संजय आरगडे,पत्रकार शहाराम आगळे यांच्या सह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

नाथ बाबाचा पादुकासह सजवलेला रथ टाळ मृदुगांच्या हरिनामाचा गजर बॅन्ड पथाकाचा सुरेल आवाज फटाक्यांच्या आतषबाजीत परिसर भक्तीमय बनला होता.श्री क्षेत्र पंढरपूरकडे नाथ बाबा पालखी सोहळा मार्गस्थ झाला.यावेळी शेवगाव नेवासा राज मार्गावरील नाथ बाबा मंदिरा परिसरात माणिक शेकडे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.