पारनेर तालुक्यातील गुंडगिरी व दहशती बाबत अजित दादांचे वक्तव्य हास्यास्पद – मनसे नेते अविनाश पवार.

. राजसाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी हिच वेळ
दत्ता ठुबे/पारनेर :-
पारनेर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टींच्या जाहीर मेळाव्यात बोलताना राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी खा.लंकेची पारनेर तालुक्यातील गुंडगिरी, दादागिरी मोडून काढण्यासाठी आमच्या उमेदवाराला मतदान करा बोलनच दुर्दैवी हास्यास्पद प्रकार असल्याचे मनसे नेते अविनाश पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले जर उप मुख्यमंत्री असुन सुद्धां पारनेर तालुक्यातील जनतेला आणि सुपा एम. आय. डी. सी. मधील उद्योगांना उद्योजकांनी संरक्षण मागुन देखील संरक्षण उपमुख्यमंत्र्यांना ते देता येत नसेल हे स्वतः जाहीर सभेत बोलताना कबुल केले हे आश्चर्य कारक आहे स्वतः राज्यांचे उप मुख्यमंत्री उद्योगांचे संरक्षण करु शकत नाही…? तर यांचा आमदार उद्योगांनसह जनतेच संरक्षण कसं करणार….? त्यामुळे अता जनतेला पारनेर तालुक्यांसह राज्य दहशत मुक्त करण्यासाठी सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्यातील राजकारणात झालेली वाताहात दुर करण्यासाठी पारनेर तालुक्यांसह राज्य दहशत मुक्त करण्यासाठी जनतेने राज साहेब ठाकरे यांच्या आव्हानांवर एकदा गांभीर्याने विचार करुन पारनेरसह महाराष्ट्रांची सत्ता एक हाती सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या हाती द्यायला हवी असे आव्हान मनसेचे माथाडी कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी केले.
पारनेर तालुक्यातील सुशिंक्षीत बेरोजगारांना इथं संधी उपलब्ध असताना सुद्धां तरुण, तरुणींना, तसेच तालुक्यातील स्थानिक भुमी पुत्रांना रोजगारासाठी आपलं गाव, आपलं घर,आपले वृध्द आई-बाप,आपला तालुका सोडून स्थलांतर होण्याची बिलकुल पण गरज नाही आहे पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीतील उद्योग धंद्यात चांगल्याप्रकारे कामं करण्याची संधी उपलब्ध असताना सुद्धां राजकीय अभिलाषेपायी स्वार्थीं माणसिकता तसेच अर्थ कारणांमुळे स्थानिकांना विश्वासात न घेता डावलले जाते हे दुर करण्यासाठी मोडीत काढण्यासाठी पारनेर तालुक्यातील जनतेसह उद्योग धंद्यांना सुरक्षित वातावरणात निर्माण करण्यासाठी पारनेर तालुक्यातील आम जनतेनं बदल घडवून सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या आव्हानांवर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे असं पवार यांनी सांगितले.