पिशोर (ता.कन्नड) येथे भव्य वधु वर मेळावा

संजय महाजन
जिरे माळी समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पिशोर तालुका कन्नड येथे भव्य वधु वर मेळावा आयोजित करण्यात आला असून वधु वर मेळावाची नोंदणी करून घेण्यासाठी संघाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
जिरे माळी समाज सेवा संघ यांच्या वतीने राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळावा दिनांक ८ डिसेंबर रोजी पिशोर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर येथे करण्याचे योजिले असून असून या अनुषंगाने न्याहाळोद येथील माजी उपसरपंच देविदास जिरे यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच दिलीप भोगे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डी.पी पाटील, आर.जे पाटील जिल्हाध्यक्ष, डी.पी पाटील सचिव, संजय साळवे विभागीय उपाध्यक्ष, अनिल घरटे संघटक, व दिपक घरटे समन्वयक आदी मान्यवर उपस्थित होते. वधु वर परिचय मेळाव्यात जास्तीत जास्त युवक युतींनी सहभागी होऊन कार्यसिद्धीस न्यावे असे प्रतिपादन माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष आर जे पाटील यांनी केले, सर्वच समाज घटकात युवक युतींचा तुटवडा जाणवत असून मेळावे घेणे फार गरजेचे आहे यात अनेक विवाह जुळले असून, समाजातील युवक युती एकत्र येऊन समन्वय साधून विचार जुळले जातात असे वक्तव्य विभागीय उपाध्यक्ष संजय साळवे यांनी केले. यावेळी माजी उपसरपंच देविदास जिरे, माजी सरपंच कैलास पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य जयवंत जाधव माजी सरपंच दिलीप भोगे,विशाल रायते, चंदू रायते, रावसाहेब भोगे आदी समाज सेवक उपस्थित होते.